Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Language: ‘यूपी-बिहारच्या मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही’; अविनाश जाधवांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

Marathi Language: रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयानंतर गोरेगाव आणि कुर्ला परिसरात झालेल्या जल्लोषावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2026 | 02:38 PM
‘यूपी-बिहारच्या मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही’; अविनाश जाधवांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

‘यूपी-बिहारच्या मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही’; अविनाश जाधवांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ
  • गोरेगाव-कुर्ल्यातील जल्लोषावर मनसे आक्रमक
  • रिक्षाचालकांच्या मुदतवाढीवरून अविनाश जाधवांचा सरकारवर निशाणा
विजय काते, भाईंदर : मराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा (Marathi Language) शिकण्यासाठी राज्य सरकारने आणखी वर्षभराची मुदत दिल्याच्या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोरेगाव-कुर्ला परिसरात मराठी भाषेच्या मुद्द्यावर झालेल्या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजप, शिवसेना तसेच मुख्यमंत्री यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली.

‘भाजपला मत देणाऱ्या मराठी माणसाने कालचा जल्लोष पाहावा’

मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात वेगळी भूमिका आणि उत्तर प्रदेश-बिहारमधील राजकारणासाठी वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने गोरेगाव-कुर्ला येथे झालेला जल्लोष पाहावा, असे आवाहन करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

“यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषेचा अपमान सुरू आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे,” अशा शब्दांत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

‘एकाने मारल्यासारखे करायचे, दुसऱ्याने रडल्यासारखे’

भाजप आणि शिंदे गटाच्या राजकारणावर टीका करताना जाधव यांनी दोन्ही पक्षांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला. “भाजप आणि शिंदे गटांनी मिळून एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे. यूपी-बिहारच्या मतदारांना खूश करण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा हा प्रकार आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न केवळ निवडणुकीपुरता किंवा राजकीय सोयीनुसार हाताळला जाऊ नये, अशी भूमिका जाधव यांनी मांडली.

मुख्यमंत्र्यांवरही थेट निशाणा

मुख्यमंत्रीपदावरूनही अविनाश जाधव यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. “स्वतःच्या ताकदीवर नव्हे, तर दुसऱ्याने बसवलेल्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचा स्वाभिमान उरत नाही,” असा थेट टोला त्यांनी लगावला. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अभिजीत राणेंनाही सुनावले

मनसे नेते अभिजीत राणे यांच्यावरही जाधव यांनी जोरदार टीका केली. “अभिजीत राणेंनी चादर बघून पाय पसरावेत; त्यांच्यासाठी आमचा विभाग अध्यक्षच पुरेसा आहे,” असा टोला लगावत त्यांनी राणे यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.

दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मीरा-भाईंदर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांशी संवाद, सदस्य नोंदणी आणि युनिट उद्घाटनासाठी अमित ठाकरे भाईंदर पूर्व येथील शंकर नारायण कॉलेज येथे दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मनसेकडून मोठी तयारी करण्यात आली असून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच मराठी भाषा, रिक्षा-टॅक्सीचालकांना देण्यात आलेली मुदतवाढ आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Web Title: Avinash jadhav slams bjp shinde sena over one year extension for auto drivers to learn marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • avinash jadhav
  • Marathi Language
  • MNS

संबंधित बातम्या

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले
1

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
2

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

Amit Thackeray : ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, तेच काम उत्तम करत आहेत,’ अमित ठाकरे यांची जहरी टीका
3

Amit Thackeray : ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, तेच काम उत्तम करत आहेत,’ अमित ठाकरे यांची जहरी टीका

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली
4

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.