फक्त आमदार बदलले, समस्या मात्र जैसे थे; कल्याणमध्ये नक्की चाललंय तरी काय
कल्याण: कल्याण पूर्वे परिसरातील नागरिक गेले कित्य़ेक वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत. याचपार्वश्वभूमीवर मूलभूत समस्यांविषयी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. रस्ते, पाणी, मैदाने आणि रुग्णालय हे विषय लवकरात लवकर मार्गी लावले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली. मात्र या पूर्वीचे आमदार गणपत गायकवाड हे देखील पंधरा वर्षापासून याच मागण्या करीत होते. आत्ता त्यांच्या पत्नी सुलभा या आमदार झाल्या आहेत. त्यामुळे कीमान आता तरी सुलभा गायकवाड यांच्या कार्यकाळात कल्याण पूर्वेतील सभोवतालच्या परिसराचा विकास पाहायला मिळावा अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.
इंदापुरात शरद पवार गट आक्रमक; ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या जोरदार घोषणा
कल्याण पूर्वेतील मतदार संघात 2009 पासून गणपत गायकवाड आमदार पदावर कार्यरत होते. त्यांनी अनेक प्रश्नांविषयी वारंवार आवाज उठवला. मात्र त्यांचे बरेच प्रयत्न अयशस्वी झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अद्यापही कल्याण पूर्वेच्य़ा विकासकामांना गती आलेली नसून अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये विकास कामांबाबत नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. गोळीबार प्रकरणानंतर आमदार गायकवाड हे तळोजा कारागृहात आहेत. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्या पत्नीला सुलभा गायकवाड उमेदवारी जाहीर केली होती. विधानसभेच्या निवडणूकीत सुलभा गायकवाड या निवडून आल्या आहेत. मात्र आता निवडणूकीचा काळ संपला असून सरकार देखील स्थापन झाले आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी कामे करणे गरजेचे आहे. असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे.
याचपार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे आणि महेश गायकवाड यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना भेटून कल्याण पूर्वेतील समस्यांबात चर्चा केली. समस्यांचे निराकरण करा अशी मागणी केली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर खळबळून जाग्या झालेल्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली. कल्याण पूर्वेतील रस्ते विकास, रस्ते समस्या यावर चर्चा केली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावं याविषयी आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली होती.
गेल्या अनेक वर्षापासून कल्याण पूर्वेतील नागरीक प्राथमिक सुविधांबाबत समस्यांचा सामना करीत आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे निवडणूकीत या विषयी लोकांमध्ये चर्चा झाली नाही. त्यामुळे दुसऱ्याच मुद्यावरुन निवडणूक लढविली गेली. त्यामुळे या परिसारातील समस्या जैसे थे अशा स्थितीत आहेत. सुलभा गायकवाड या आमदार झाल्या आहेत. निदान आता तरी या समस्या सुटतील अशी लोकांना आपेक्षा आहे. केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांना देखील नागरीकांच्या समस्या सोडविण्याविषयी गांभीर्य दाखविले पाहिजे अशी आपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता येत्या काही काळात कल्याण पुर्वे परिसरात विकाम कामांना वेग येणार का ? तसंच परिसरातील नागरिकांचे प्रश्न सुटतील हे पाहणं आता औस्त्युक्याचं ठरणार आहे.