Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli Joshi School Bridge: डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी? जोशी स्कूल पुलाचा रखडलेला ‘आर्म’ महासभेत गाजला

Dombivli Joshi School Bridge: डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी स्कूलजवळील पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2026 | 03:57 PM
डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी? जोशी स्कूल पुलाचा रखडलेला ‘आर्म’ महासभेत गाजला

डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी? जोशी स्कूल पुलाचा रखडलेला ‘आर्म’ महासभेत गाजला

Follow Us
Follow Us:
  • जमीन अधिग्रहणात अडकला डोंबिवलीतील महत्त्वाचा पूल
  • 90 फूट रोडकडे जाणारा आर्म वर्षानुवर्षे रखडला
  • जोशी स्कूल पुलाचा रखडलेला ‘आर्म’ महासभेत गाजला
Dombivli Joshi School Bridge News in Marathi: डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी स्कूलजवळील महत्त्वाच्या पुलाचे रखडलेले काम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिणामी नागरिकांना पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नसून परिसरातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे.

KDMC महासभेत मुद्दा उपस्थित

20 ऑगस्ट रोजी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे आणि नगरसेविका खुशबू चौधरी यांनी या प्रलंबित कामाचा मुद्दा उपस्थित केला. डोंबिवली पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र 90 फूट रस्त्याकडे जाणारा आर्म पूर्ण झालेला नसल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणी कायम असल्याचे त्यांनी महासभेत निदर्शनास आणून दिले.

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

जमीन अधिग्रहणामुळे कामाला ‘ब्रेक’

पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील प्रलंबित बाबींमुळे काम रखडले आहे. अनेक वर्षे उलटूनही हा प्रश्न मार्गी न लागल्याने नागरिकांमध्येही नाराजी आहे. जमीन अधिग्रहणातील सर्व अडथळे तातडीने दूर करून पुलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी दीपेश म्हात्रे आणि खुशबू चौधरी यांनी केली.

महापौर-आयुक्तांकडून प्रशासनाला निर्देश

महासभेत करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत महापौर आणि महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले. जमीन अधिग्रहणासह पुलाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

90 फूट रोडचा आर्म पूर्ण झाल्यास काय फायदा?

जोशी स्कूलजवळील पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली पूर्व-पश्चिम दरम्यानची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. वाहनांना पर्यायी जोडमार्ग उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या मार्गांवरील वाहतुकीचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी करणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.

‘प्रशासनाने तातडीने प्रश्न मार्गी लावावा’

अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाबाबत प्रशासनाने आता गांभीर्याने निर्णय घ्यावा, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि नागरिकांना पुलाचा पूर्ण लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे आणि नगरसेविका खुशबू चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Web Title: Dombivli joshi school east west bridge 90 feet road arm work pending dipesh mhatre demands completion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Dombivli
  • Traffic

संबंधित बातम्या

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
1

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब
2

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

Nashik News: श्रावणी सोमवारच्या गर्दीचा वाहतुकीला फटका; खड्डे अन् अपघातांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्ग ठप्प
3

Nashik News: श्रावणी सोमवारच्या गर्दीचा वाहतुकीला फटका; खड्डे अन् अपघातांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्ग ठप्प

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
4

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.