Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News : डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६ ची तारीख ठरली! २९ नोव्हेंबरला रंगणार तिसरं पर्व

Dombivli News : डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६ चं तिसरं पर्व २९ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलं आहे. यंदा १० हजार धावपटूंच्या सहभागाचं लक्ष्य असून, २१.१ किमी, १० किमी आणि ५ किमी टाइम रनसह फन रनचाही समावेश आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 23, 2026 | 09:40 PM
Dombvli run tshirt launch

Dombvli run tshirt launch

Follow Us
Follow Us:
  • ९ नोव्हेंबरला डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनचं आयोजन
  • रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते टी-शर्ट आणि मेडलचं अनावरण
  • विजेत्यांसाठी ३ लाख रुपयांची पारितोषिके
 

Dombivli News : डोंबिवलीकरांनो, रनिंग शूज तयार ठेवा! आरोग्य, मैत्री आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’चं तिसरं पर्व येत्या २९ नोव्हेंबरला रंगणार आहे. ‘डोंबिवली शहराचा उत्सव’ ही खास संकल्पना घेऊन आयोजित होणाऱ्या या उपक्रमासाठी आयोजकांनी तयारीला वेग दिला आहे. यंदा तब्बल १० हजार धावपटूंना सहभागी करून घेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

आरोग्य, मैत्री आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’चे तिसरे पर्व येत्या २९ नोव्हेंबर २०२६ रोजी डोंबिवलीत आयोजित करण्यात आले आहे. ‘डोंबिवली शहराचा उत्सव’ ही संकल्पना केंद्रस्थानी असलेल्या या पर्वाच्या तयारीला वेग आला आहे. दुर्गाष्टमीचे औचित्य साधून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘नमो रमो नवरात्री’च्या प्रांगणात या उपक्रमाच्या थीम टी-शर्ट आणि मेडलचे अनावरण करण्यात आले.

‘कल्याण डोंबिवली रनर्स’ (KDR) यांच्या वतीने आणि ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना एकत्र आणणे, राज्यातील धावपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि धावण्याच्या माध्यमातून आरोग्य, मैत्री व बंधुभावाची भावना वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदा ‘डोंबिवली शहराचा उत्सव’ या संकल्पनेतून डोंबिवलीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कलेची आवड, क्रीडाप्रेम आणि आरोग्याविषयीची जागरूकता यांचे दर्शन घडणार आहे. कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमाच्या मागील दोन पर्वांमध्ये सुमारे ६ हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. यंदा हा आकडा १० हजारांपर्यंत नेण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत.” असेही कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने रविंद्र सकपाळ यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी युवासेनेचा मदतीचा हात; श्रीकांत शिंदे फाउंडेशनला १० लाखांचा धनादेश सुपूर्द

पाच प्रकारांत धावण्याची संधी

“सर्व वयोगटांमधील व्यावसायिक धावपटूंसोबतच फिटनेसप्रेमी, कुटुंबे आणि मुलांपर्यंत सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी या रनिंग इव्हेंटमध्ये २१.१ किमी, १० किमी व ५ किमी या टाईम रन आणि ५ किमी व १.६ किमी फन रन अशा ५ रनिंग कॅटेगरीज उपलब्ध असतील. टाईम रन विजेत्यांसाठी सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.” अशी माहिती कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने सुरज शेट्टी यांनी दिली.

“विशेष म्हणजे, ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी १.६ किलोमीटर फन रन पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे. लहान वयापासूनच मुलांना मैदानी उपक्रम आणि व्यायामाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास आणि तंदुरुस्तीचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक मुलांनी आणि कुटुंबांनी या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वयोगटानुसार पारितोषिकांची रक्कम आणि सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट व Instagram पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.” असेही कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने रविंद्र सकपाळ यांनी सांगितले.

‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’ला ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनची मान्यता असणार आहे. या रनमध्ये नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला ड्राय-फिट टी-शर्ट, फिनिशर मेडल, हायड्रेशनची सुविधा आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. टाईम रन श्रेणीतील धावपटूंना टायमिंग चिप आणि क्वॉलिफिकेशन सर्टिफिकेटही मिळेल. याशिवाय, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंना पार्टिसिपेशन सर्टिफिकेटसह त्यांचे फोटोही विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या सहभागाच्या आणि यशाच्या आठवणी जपता येतील. यासोबतच धावपटूंना सुरक्षित आणि नियोजनबद्ध अनुभव मिळावा, यासाठी आयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. स्पर्धेचा मार्ग लवकरच जाहीर करण्यात येईल.” अशी माहिती कल्याण डोंबिवली रनर्स यांच्या वतीने सुरज शेट्टी यांनी दिली.

३१ ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी

“‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटूंनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनुभवी आणि नवोदित धावपटू, मुले, पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नोंदणीसाठी www.dombivlikarfriendshiprun.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करावे.”, असे आवाहन कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने रविंद्र सकपाळ यांनी केले आहे.

” ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून शहरातील नागरिकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. यंदाच्या पर्वातून फिटनेस, मैत्री यासोबतच डोंबिवलीच्या संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धावपटूंचा उत्साह वाढवावा आणि डोंबिवलीच्या एकजुटीचा उत्सव साजरा करावा”, असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.

Badlapur News: बदलापूर एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनदी धोक्यात; रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने जलप्रदूषण

Web Title: Dombivli news dombivlikar friendship run 2026 dombivli registration vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Dombivli News
  • kalyan dombivali news
  • Ravindra Chavan
  • Thane news

संबंधित बातम्या

Badlapur News: बदलापूर एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनदी धोक्यात; रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने जलप्रदूषण
1

Badlapur News: बदलापूर एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनदी धोक्यात; रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने जलप्रदूषण

Thane Coastal Road: घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होणार? फ्लेमिंगो आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी कठोर अटी
2

Thane Coastal Road: घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होणार? फ्लेमिंगो आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी कठोर अटी

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह
3

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन
4

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.