Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फळबाजारात भेसळीचा पर्दाफाश; आंबे पिकवण्यासाठी इथेनॉल स्प्रेचा वापर, ठाणे, वाशीत एफडीएची छापेमारी

उन्हाळ्यात आंब्यांची मागणी वाढत असताना काही व्यापारी नियमबाह्य पद्धतीने फळे पिकवत असल्याचे उघड झाले आहे. एफडीएच्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर आंबे जप्त करण्यात आले असून अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 10:45 AM
फळबाजारात भेसळीचा पर्दाफाश; आंबे पिकवण्यासाठी इथेनॉल स्प्रेचा वापर, ठाणे, वाशीत एफडीएची छापेमारी

फळबाजारात भेसळीचा पर्दाफाश; आंबे पिकवण्यासाठी इथेनॉल स्प्रेचा वापर, ठाणे, वाशीत एफडीएची छापेमारी

Follow Us
Follow Us:
  • आंबे पिकवण्यासाठी नियमबाह्य पद्धतींचा वापर केल्याचा प्रकार उघड.
  • एफडीएच्या छापेमारीत लाखो रुपयांचा माल जप्त.
  • अनेक प्रतिष्ठानांवर कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात धडक मोहीम राबवली असून, ३०-३१ मे दरम्यान केलेल्या कारवाईत ठाणे जिल्ह्यात तसेच वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) छापेमारी केली. या कारवाईत आंबे पिकवण्यासाठी इथेनॉल सदृश सोचा वापर होत असल्याचे आढळून आले असून, एफडीएने ११ लाखांचे आंबे जप्त केले आहेत. तसेच ३७ जणांना अटकही करण्यात आली आहे.

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमांनुसार, आंबे किंवा इतर फळे पिकवण्यासाठी थेट फळांवर इथेनॉल स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे. व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा इथिलिन गॅस चेंबरचाच वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, तपासणीदरम्यान अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून थेट फळांवरच स्प्रे मारताना रंगेहात पकडले गेले. या जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

३६ प्रतिष्ठानांवर बडगा

कारवाईत एकूण ३६ प्रतिष्ठानांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. या प्रतिबंधित पदार्थाच्या कारवाई दरम्यान प्रशासनाने ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे. बेकायदेशीरपणे या पदार्थाची विक्री करणा-या विक्रेत्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात व्यापक मोहीम

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीत कैल्शियम कार्बाइडसारख्या अत्यंत जीवघेण्या आणि घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आलेला नाही, परंतु इथेनॉल सोचा चुकीचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच, जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून २९ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या आरोग्याला घातक व प्रतिबंधित अन्न पदार्थ्यांच्या विरोधातही नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट व ठाणे जिल्ह्यात व्यापक मोहीम राबविण्यात आली.

Thane water cut: मान्सूनपूर्वी ठाणेकरांची चिंता वाढली! ३ जूनला शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं, “66 जनतेच्या आरोग्याशी खेळ करणा-या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनाला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणा-याविरोधात केवळ दंडात्मक नव्हे तर थेट फौजदारी कारवाई केली जाईल”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Fda raids thane vashi apmc mango ripening irregularities 11 lakh mangoes seized 37 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • FDI
  • Mango Market
  • thane
  • Vashi

संबंधित बातम्या

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
1

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!
2

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…
3

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत
4

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.