Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘I love Muhammad’ प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही, सामाजिक समतेसाठी GEN Z उतरले रस्त्यावर

देशात धार्मिक विषमता पसरविण्याचे प्रयत्न होत असतानाच मुंब्र्यातील झेन झी अर्थात तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी, या उद्देशाने रस्त्यावर उतरली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 26, 2025 | 05:42 PM
‘I love Muhammad’ प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही, सामाजिक समतेसाठी GEN Z उतरले रस्त्यावर
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : देशात धार्मिक विषमता पसरविण्याचे प्रयत्न होत असतानाच मुंब्र्यातील झेन झी अर्थात तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी, या उद्देशाने रस्त्यावर उतरली. “आय लव्ह मोहम्मद” आणि “आय लव्ह महादेव” असे नारे देत हिंदू-मुस्लीम तरूणांनी द्वेष नको, प्रेम हवे, असा संदेश दिला.

कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर्स लावून समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुंब्रा हे उपनगर सामाजिक एकोपा जोपासणारे शहर आहे, हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद , बासित शेख आणि यश चौधरी या तिघांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मशिद येथे शांततापूर्ण निदर्शने केली.

अजित पवार गटाला जोरदार झटका! ‘या’ बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर हजारो तरूण रस्त्यावर एकवटले. कोणताही राजकिय पक्ष, संघटनांना सहभागी न करता केवळ 18 ते 25 वयोगटातील तरूणांनी हातात, आय लव्ह मोहम्मद अन् आय लव्ह महादेव असा संदेश लिहिलेले पोस्टर्स हातात धरून निदर्शने केली. याप्रसंगी संघर्ष नको, प्रेम हवे; शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील; भेदाभेद नको, समता हवीय अशा घोषणा यावेळी झेन झी देत होते.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आरिफ सय्यद म्हणाले की, हा देश सर्व जातीधर्मांचा आहे. मात्र, धर्माच्या नावावर लोकांची माथी भडकावली जात आहेत. तरूणांना शांतता हवी आहे. द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही या आंदोलनातून धडा दिला आहे. द्वेषाच्या दलदलीत आम्ही प्रेमाची फुले उगवणार आहोत, असे सांगितले.

याबाबत बासित शेख यांनी, आमचा लढा प्रेमासाठी आहे. दोन धर्मातील तेढ संपविण्यासाठी आज मोठ्या संख्येने तरुणाई एकवटली आहे. हाच संदेश द्वेष पसरविण्यासाठी पूरक आहे, असे सांगितले. तर यश चौधरी या तरूणाने सांगितले की, मुंब्रा हे असे शहर आहे की जिथे हिंदू, मुस्लीम, बौद्ध आणि इतर धर्मिय एकोप्याने रहात असतात. गणेशोत्सव- नवरात्रोत्सवात मुस्लीम बांधव आमच्या घरी येतात तर ईदला आम्ही त्यांच्या घरी जातो. सामाजिक एकात्मता जोपासणाऱ्या शहराची ओळख सबंध देशाला करून देण्यासाठी आम्ही आय लव्ह मोहम्मद अन् आय लव्ह महादेवचा नारा देत आहोत, असे सांगितले.

पुण्यात काँग्रेसला पुन्हा धक्का; रोहन सुरवसे पाटलांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

Web Title: I love muhammad incident has repercussions in maharashtra too gen z takes to the streets for social equality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Gen Z
  • Maharashtra Political
  • Thane news

संबंधित बातम्या

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत
1

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
2

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण
3

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण

Nepal Violence: काल ओली हजर झाले अन् आज घोटाळा, पाच मंत्र्यांवरही कारवाई; नवीन सरकारचा अभूतपूर्व निर्णय
4

Nepal Violence: काल ओली हजर झाले अन् आज घोटाळा, पाच मंत्र्यांवरही कारवाई; नवीन सरकारचा अभूतपूर्व निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.