पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Kalyan Redevelopment Project: कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात टायकून समूहाकडून सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पावरून रहिवाशांमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. या प्रकल्पातील रहिवाशांच्या एका गटाने बिल्डरविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसऱ्या गटाने या प्रकरणात राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आम्हाला घर पाहिजे, राजकारण नको’ अशी भूमिका घेत रहिवाशांचा दुसरा गट पुढे आला आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने देखील उडी घेतली असून बिल्डर विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
कल्याण पश्चिम येथील चिकन घर परिसरात पुनर्विकासाअंतर्गत इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित भाडेकरूंना अद्याप अपेक्षित भाडे मिळाले नसल्याचा तसेच पुनर्विकासातील घरेही मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रहिवाशांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात बिल्डर श्रीकांत शितोळे आणि त्यांच्या चार साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर रहिवाशांच्या एका गटाने आक्रमक भूमिका घेतली.
Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल
बिल्डरकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात भाडे आणि घर दोन्ही मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, रहिवाशांचा दुसरा गटही खडकपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दुसऱ्या गटातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, बिल्डरसमोर असलेल्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. “आम्हालाही आमचे घर हवे आहे. मात्र, या प्रकरणात केवळ राजकारण केले जाऊ नये. काही राजकीय व्यक्ती या प्रकरणात हस्तक्षेप करून राजकारण करत आहेत. त्यामुळे पुनर्विकासाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होत आहे,” असा आरोप या गटाने केला.बिल्डरच्या अडचणी असल्या तरी आम्हाला आमची घरे मिळाली पाहिजेत. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावावा,” अशी मागणी यारहिवाशांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी देखील खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले त्याने बिल्डर कारवाईची मागणी केली आहे.






