कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घर मालकाच्या माहितीनुसार, गेल्या अडीच महिन्या पासून फ्लॅट क्रमांक १०४ मधून पाणी बाहेर पॅसेजमध्ये वाहत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर त्यांनी भाडेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने संशय अधिक बळावला.दरम्यान, घरमालकाला आरोपी महिलेचा एक व्हॉईस मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये प्रियकराचा खून केल्याचे सांगत मृतदेह बाथरूममध्ये असल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.