Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार ? बंद पडलेलेल्या सिग्नलबाबत ठाकरे गट आक्रमक

सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्की नाका येथे मागील काही दिवसांपासून सिग्नल बंद अवस्थेत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 29, 2025 | 04:00 PM
KDMC News : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार ? बंद पडलेलेल्या सिग्नलबाबत ठाकरे गट आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण/ स्नेहा जाधव काकडे : वाढत्या लोकसंख्य़ेमुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होत आहे. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्की नाका येथे मागील काही दिवसांपासून सिग्नल बंद अवस्थेत आहे. यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, रस्त्यावरील प्रवास अतिशय त्रासदायक बनला आहे.

वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालक, पादचारी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर शिस्त नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Crime News : राज्यात 443 लाचखोर गजाआड, शासकीय कार्यालयांना लाचखोरीची वाळवी

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 19 (फ) नुसार सार्वजनिक वाहतुकीचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवाह राखणे आवश्यक आहे. या अनुषंगाने, चक्की नाका परिसरातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी वाहतूक विभागाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.

ठाणे महापालिकेतील ‘या’ महत्वाच्या पदांवर कार्यरत असणाऱ्या लोकांची पदोन्नती, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

*वाहतूक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करावी.
*वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात करावेत.
*वाहनचालकांसाठी सूचना फलक (साइनबोर्ड्स) लावण्यात यावेत.

या परिस्थितीकडे वाहतूक विभागाने गांभीर्याने पाहून, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी सर्व नागरिक, स्थानिक व्यापारी, शाळा व्यवस्थापन आणि सामाजिक संस्थांची कळकळीची मागणी आहे.

जर वेळेत कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुढील आंदोलनात्मक भूमिका घेतली जाऊ शकते, असा इशाराही कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा संघटक तात्यासाहेब माने,उप जिल्हाप्रमुख श्री राहुल भगत,श्री सदाशिव गायकर,विधानसभा संघटक श्री विजय भोईर,तालुकाप्रमुख भगवान शांताराम पाटील, तालुका संघटक,भालचंद्र म्हात्रे,उप तालुकाप्रमुख,परेश पाटील,मुकेश नाना भोईर, किरण पाटील,धनंजय गायकर युवा सेना,विभागप्रमुख नागेश पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Kdmc news will the traffic jam problem be solved thackeray group aggressive regarding the broken signal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • thane
  • Traffic News

संबंधित बातम्या

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
1

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.