Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला? अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; भाजपवर टीका

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २०२६-२७ अर्थसंकल्पीय महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी. सुरक्षा रक्षकांचा गराडा आणि सत्ताधाऱ्यांवर दडपशाहीचे आरोप. लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह?

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 09:27 PM
मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला?

मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला?

Follow Us
Follow Us:

 

  • मिरा-भाईंदर महासभेत ‘LIVE’ बंद!
  • कॅमेऱ्यांवर बंदीमुळे मोठा वाद, भाजपवर टीका
  • काय लपवलं जातंय?
भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी २७ मार्च रोजी दुपारी महापौर डिंपल यांच्या आदेशानुसार सर्वसाधारण महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेसाठी शहरातील विविध वृत्तसंस्थांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, सभेच्या कामकाजाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना यावेळी घडली.

महासभेच्या ठिकाणी पत्रकार गॅलरीत स्पष्टपणे “चित्रीकरण व थेट प्रसारणास मनाई” असे आदेश लावण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच पत्रकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी प्रशासनाने थेट पत्रकार गॅलरीतच दहा ते बारा सुरक्षा रक्षक तैनात केले होते. पत्रकारांनी मोबाईल किंवा कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षकांकडून त्यांना थांबवण्यात येत होते. यामुळे पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांमध्ये काही वेळा वादाचे प्रसंगही उद्भवले.

“महासभा ही लोकशाही प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून नागरिकांना त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. अशा वेळी चित्रीकरणावर बंदी घालणे म्हणजे पारदर्शकतेला बाधा आणणे आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे सत्ताधारी भाजपवर ‘दडपशाही’चे आरोप होत आहेत. विरोधकांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. “महासभेचे कामकाज जनतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न का केला जात आहे? अशी कोणती बाब आहे जी नागरिकांपर्यंत पोहोचू दिली जात नाही?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.

Mumbai Local: कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा, डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी

दरम्यान, हा प्रकार नवीन नसल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी झालेल्या महासभेतही महापौरांकडून चित्रीकरणास मनाई करण्यात आली होती. त्या वेळी पत्रकारांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाने महासभेचे थेट प्रसारण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करून त्याची लिंक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यावेळी तसे कोणतेही थेट प्रसारण उपलब्ध करून देण्यात आले नाही.
उलट, महासभेत केवळ अधिकृत पत्रकारांनाच प्रवेश द्यावा, यासाठी प्रशासनाने वृत्तवाहिन्यांच्या संपादकांकडून शिफारसपत्र मागवले होते. तरीही चित्रीकरणाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडल्यामुळे पत्रकारांमध्ये अधिकच नाराजी निर्माण झाली. परिणामी, चित्रीकरण करू इच्छिणाऱ्या पत्रकारांना प्रत्यक्षात रोखण्यात आले.

प्रामुख्याने, महासभेचे चित्रीकरण करायचे की नाही, याचा अधिकार महापौरांकडे असतो. त्या अधिकाराचा वापर करत हे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असताना, दुसरीकडे माध्यमांवर निर्बंध लादले जात असल्याने मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कामकाजातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणावर प्रशासनाकडून स्पष्ट स्पष्टीकरण देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

Web Title: Mira bhayandar municipal corporation journalists banned from filming during budget session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Budget
  • mira bhayandar
  • Mira Bhayandar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली
1

Mira Bhayandar News: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ
2

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!
3

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!

Mira Bhayandar News : महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; आदिवासी जमीन प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात खळबळ
4

Mira Bhayandar News : महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; आदिवासी जमीन प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.