Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : मिरा भाईंदर शहरात पोलीस-पालिका आमनेसामने! ५.२१ कोटींच्या बंदोबस्त शुल्कावरून नवा वाद

मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्यात पोलीस बंदोबस्त शुल्क आणि थकीत भाड्यावरून वाद निर्माण झाला आहे. विविध कारवायांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे ५.२० कोटी रुपये देण्याची मागणी पोलीस आयुक्तालयाने केली असताना, महापालिकेने ती कायद्याचा आधार घेत फेटाळली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 03:35 PM
मिरा भाईंदर शहरात पोलीस-पालिका आमनेसामने! ५.२१ कोटींच्या बंदोबस्त शुल्कावरून नवा वाद (फोटो सौजन्य-ChatGPT)

मिरा भाईंदर शहरात पोलीस-पालिका आमनेसामने! ५.२१ कोटींच्या बंदोबस्त शुल्कावरून नवा वाद (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदर पालिका विरुद्ध पोलीस आयुक्तालय
  • ५.२० कोटींच्या बंदोबस्त शुल्कावरून वाद चिघळला
  • उलट पोलीस विभागाकडे थकीत भाड्याची केली कोट्यवधींची मागणी
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्यात पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कावरून आणि महापालिकेच्या मालमत्तांच्या थकीत भाड्यावरून वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाया, निवडणुका तसेच विविध शासकीय कार्यक्रमांदरम्यान पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तालयाने महापालिकेकडे तब्बल ५ कोटी २० लाख ६६ हजार ९११ रुपये मागितले आहेत. मात्र, ही मागणी महापालिकेने कायद्याचा आधार घेत फेटाळून लावत अपर पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र पाठविले आहे.

महापालिकेने पत्रात स्पष्ट केले आहे की, कायदा व सुव्यवस्था राखणे, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करणे आणि महापालिकेच्या कायदेशीर कारवायांना संरक्षण देणे हे पोलिसांचे वैधानिक कर्तव्य आहे. त्यामुळे अशा कामांसाठी बंदोबस्त शुल्क आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४८३ तसेच उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचा हवाला देत महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

NARENDRA MEHTA : “सरनाईकांमुळे आदिवासी शेतकऱ्याने गळफास लावला” -नरेंद्र मेहता

याच पत्रात महापालिकेने पोलीस विभागाकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत भाड्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेने पोलीस मुख्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, काशिगाव व नयानगर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेसाठी आपल्या मालकीच्या इमारती व जागा भाड्याने उपलब्ध करून दिल्या आहेत. या मालमत्तांचे भाडे अनेक वर्षांपासून पूर्णपणे अदा झाले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, मीरा रोड येथील आरक्षण क्रमांक २५१ व ३२६ मधील वाहतूक शाखेसाठी देण्यात आलेल्या जागेचे ६ कोटी ९६ हजार ७ रुपये इतके भाडे अद्याप थकीत आहे. तसेच पोलीस मुख्यालय, उपायुक्त कार्यालय, काशिगाव आणि नयानगर पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे एकूण भाडे ७ कोटी २४ लाख ९४ हजार ७२७ रुपये झाले असून, त्यापैकी पोलीस विभागाने ३ कोटी ८९ लाख ५८ हजार ४५६ रुपये अदा केले आहेत. त्यामुळे ३ कोटी ३५ लाख ३६ हजार २७१ रुपये अजूनही थकीत असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तालयाने ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध बंदोबस्तासाठी झालेल्या खर्चापोटी ५.२१ कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच ही रक्कम महापालिकेकडून मिळणाऱ्या भाड्यातून समायोजित करून उर्वरित १ कोटी ८५ लाख ३० हजार ६४० रुपये पोलीस आयुक्तालयाच्या नावे जमा करण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी आणि कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची मूलभूत जबाबदारी असल्याने त्यासाठी स्वतंत्र शुल्क देण्याची कायदेशीर तरतूद नसल्याचे प्रशासनाने पत्रात नमूद केले आहे.

महापालिकेच्या या भूमिकेमुळे पोलीस आयुक्तालय आणि महापालिका यांच्यात आर्थिक व प्रशासकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे पोलीस विभाग बंदोबस्ताचा खर्च वसूल करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे महापालिका थकीत भाडे तातडीने अदा करण्याची मागणी करत असल्याने दोन्ही यंत्रणांमधील हा वाद पुढील काळात कोणते वळण घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar News: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली

Web Title: Mira bhayandar municipal corporation vs police commissionerate security fee dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
1

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
2

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत
4

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.