Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

Maharashtra Security Force: महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांना प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या विविध आस्थापनांच्या सुरक्षेसाठी तैनात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या (MSF) 333 जवानांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2026 | 04:15 PM
पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

Follow Us
Follow Us:
  • पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’!
  • सुरक्षा महामंडळाचे ३३३ जवान हटवणार
  • खासगी कंत्राटदारांसाठी पालिकेची सुरक्षा व्यवस्था बदलण्याचा घाट?
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा एकदा ‘कंत्राटी’ मार्गाने फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सुरक्षा महामंडळाचे (एमएसएफ) सुरक्षारक्षक अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचा दावा करत त्यांच्या ४४२ जवानांपैकी तब्बल ३३३ जवान कमी करून त्यांच्या जागी खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा ठराव महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी खासगी सुरक्षारक्षकांविरोधात गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कमी करून एमएसएफकडून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांना संधी देण्याच्या निर्णयावर जागरूक नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पालिकेच्या विविध कार्यालये, सभागृह, उद्याने आणि इतर महत्त्वाच्या मालमत्तांच्या सुरक्षेसाठी २०२३ मध्ये राज्य सुरक्षा महामंडळाचे ४४२ जवान आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे ५१ जवान नियुक्त करण्यात आले होते. खासगी सुरक्षारक्षकांच्या कामकाजाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने पालिका प्रशासनाने ही व्यवस्था बदलली होती. गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी या दोन संस्थांवर होती.

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

‘एमएसएफ’ जवान मोबाईलमध्ये व्यस्त?

नुकत्याच झालेल्या महासभेत सुरक्षा व्यवस्थेतील बदलाचा विषय चर्चेला आला. यावेळी सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेने एमएसएफच्या जवानांच्या कार्यपद्धतीवरच गंभीर आक्षेप घेतला. जवान कर्तव्यावर असताना मोबाईलमध्ये व्यस्त असतात, तसेच आंदोलने आणि मोर्चे योग्य पद्धतीने हाताळले जात नसल्याने पालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण होतात, असा दावा करण्यात आला.

या आरोपांच्या आधारे एमएसएफच्या जवानांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय पुढे आला. मात्र, खासगी सुरक्षारक्षकांच्या कार्यक्षमतेबाबत पूर्वी तक्रारी होत्या, त्या तक्रारींचे काय झाले? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

खासगी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी निर्णय?

एमएसएफ ही राज्य सरकारच्या अखत्यारीतील सुरक्षा यंत्रणा असून विमानतळ, मेट्रो स्थानके, पोलिस कार्यालये, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, मोठी शासकीय रुग्णालये, शासकीय बँका, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे आणि विविध शासकीय कार्यालयांच्या सुरक्षेची जबाबदारी या यंत्रणेकडे आहे. अशा संस्थेचे शेकडो जवान कमी करून पुन्हा खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

यापूर्वी खासगी सुरक्षारक्षकांविरोधात तक्रारी आल्या म्हणून त्यांना हटवले, मग आता पुन्हा त्याच खासगी व्यवस्थेला प्रवेश का? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. या निर्णयामागे प्रशासनिक गरज आहे की कंत्राटदाराच्या फायद्याचा विचार, याचीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

४४२ पैकी ३३३ जवान कमी; ८९ राहणार

महासभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार एमएसएफच्या ४४२ जवानांपैकी ३३३ जवान कमी करून त्यांच्या जागी निविदा प्रक्रियेद्वारे खासगी कंपनीचे सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आहेत. तर ८९ एमएसएफ जवान कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या व्यवस्थेसाठी होणाऱ्या आर्थिक खर्चासह प्रशासकीय मान्यतेलाही मंजुरी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या ठरावाला सत्ताधारी भाजपसोबतच काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनीही सर्वानुमते मंजुरी दिली. त्यामुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील एवढ्या मोठ्या बदलाला विरोधाचा सूर का उमटला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सुरक्षेची जबाबदारी तीन संस्थांवर; समन्वयाचा बोजवारा उडणार?

या निर्णयानंतर महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी एमएसएफ, सुरक्षा रक्षक मंडळ आणि खासगी सुरक्षा कंपनी, अशा तीन वेगवेगळ्या संस्थांवर राहणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत समन्वयाचा अभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष कामकाजात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या महत्त्वाच्या मालमत्ता, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना एकसंध सुरक्षा यंत्रणा उभारण्याऐवजी तीन संस्थांमध्ये जबाबदारी विभागण्याची गरज काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.

‘सुरक्षा’ की ‘कंत्राट’ महत्त्वाचे?

महासभेच्या निर्णयामुळे आता खरी कसोटी निविदा प्रक्रियेची असणार आहे. खासगी सुरक्षा कंपनीची निवड कोणत्या निकषांवर होणार, कंत्राटाची किंमत किती असेल, किती सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आणि त्यांच्या कामावर नियंत्रण कोण ठेवणार, याबाबत पारदर्शकता राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारी सुरक्षा यंत्रणेचे शेकडो जवान कमी करून पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांना संधी देण्यामागे नेमके कारण काय? हा प्रश्न आता पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना उत्तरावा लागणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली पुन्हा कंत्राटदारांचे हित साधले जाणार नाही ना, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याची मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.

Mumbai Local Megablock : रविवारी प्रवाशांचा खोळंबा! मेगाब्लॉकमुळे ट्रान्स-हार्बरला फटका; वंदे भारतसह एक्स्प्रेसही होणार लेट

Web Title: Municipal corporation to remove 333 msf security personnel private security guards may return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra

संबंधित बातम्या

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
1

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
2

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

FDAचा राज्यभर दणका! ११.८२ लाखांचं संशयास्पद खाद्यतेल जप्त; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित
3

FDAचा राज्यभर दणका! ११.८२ लाखांचं संशयास्पद खाद्यतेल जप्त; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
4

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.