Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Amit Shah–Eknath Shinde Meeting : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर विमानतळावर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 04:50 PM
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Follow Us
Follow Us:
  • अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात विमानतळावर 10 मिनिटे चर्चा
  • शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीचा मुद्दा चर्चेत असल्याची सूत्रांची माहिती
  • ‘चिंता करू नका’ असा अमित शाहांनी शिंदेंना शब्द दिल्याची चर्चा
मुंबई (Amit Shah–Eknath Shinde Meeting): महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना राखीही बांधली.

मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शाह दिल्लीकडे रवाना झाले. मात्र, विमानतळावर रवाना होण्यापूर्वी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे दहा मिनिटे स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे.

शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर चर्चा?

सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये असलेल्या कथित नाराजीचा मुद्दा या चर्चेत असल्याची माहिती आहे.

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या नियमावरून राजकीय वातावरण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर मराठी भाषेचे प्रमाणपत्र नसलेल्या किंवा मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर आली होती.

या निर्णयामुळे काही परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियमाच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे शिवसेनेतील काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात विमानतळावर झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

‘चिंता करू नका’, अमित शाहांचा शिंदेंना शब्द?

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना मंत्र्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाबाबत अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. यावेळी अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना ‘चिंता करू नका’, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Rahul Gandhi PC Live: हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला

दरम्यान, विमानतळावरील या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत दोन्ही नेत्यांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीकडे पाहावे लागणार आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा आता सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत समीकरणांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. त्यामुळे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या या दहा मिनिटांच्या भेटीचे राजकीय पडसाद पुढील काळात उमटतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Amit shah eknath shinde meeting mumbai airport shiv sena ministers discontent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
1

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
2

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
3

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
4

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.