Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Farmers Crisis: पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून पिकांच्या नुकसानीमुळे चिंता वाढली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2026 | 01:45 PM
पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पावसाने दिली हुलकावणी
  • सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात!
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : पावसाने तब्बल दीड महिन्यापासून दडी मारल्याने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सोयाबीनसह खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. ऐन पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक भागांतील पिके पाण्याअभावी वाळून गेली असून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, त्यांना तातडीच्या शासकीय मदतीची गरज निर्माण झाली आहे. (Farmers Crisis)

या गंभीर परिस्थितीची दखल घेत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांना पत्र देऊन नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

Dharashiv Politics: भाजप प्रवेशासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा यू-टर्न; ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची झालेली सद्यस्थिती लक्षात घेऊन महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने प्रत्यक्ष पाहणी, पंचनामे आणि नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे. या सर्वेक्षणात प्रत्यक्ष नुकसान झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश करून शासनाच्या निकषांनुसार तात्काळ पीक नुकसानभरपाई व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. मात्र, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता मदत मिळावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष मदत पोहोचवावी, अशी आग्रही मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

Dharashiv Farmers :   21 हजार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी जमा

Web Title: Soybean farmers in crisis due to lack of rain omprakash rajenimbalkar demands financial aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Relief for livestock farmers : दुष्काळात पशुपालकांना दिलासा! वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार, शेतकरी गटांना २० हजारांचे चारा बियाणे
1

Relief for livestock farmers : दुष्काळात पशुपालकांना दिलासा! वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार, शेतकरी गटांना २० हजारांचे चारा बियाणे

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
2

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
3

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
4

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.