Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Ashok Chavan News: अलीकडच्या काळात नांदेड महानगरपालिकेची निवडणूक नसताना अशोक चव्हाण यांना महानगर कोअर कमिटीपुरते मर्यादित ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 29, 2026 | 04:28 PM
Nanded News, Ashok Chavan, Nanded BJP Core Committee

Nanded News, Ashok Chavan, Nanded BJP Core Committee

Follow Us
Follow Us:
  • भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याची कोअर कमिटी केली जाहीर
  • नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघांच्या कमिटीत खासदार अशोक चव्हाणांना स्थान नाही
  • अशोक चव्हाण यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण
Nanded BJP Politics: नांदेडच्या राजकीय वर्तुळात संध्या भाजपने जाहीर केलेल्या कोअर कमिटीची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यासाठी कोअर कमिटी जाहीर केली. पण माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांना नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोअर कमिटीत त्यांना स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कमिटी जाहीर करण्यात आली. पण अशोक चव्हाण यांचा ग्रामीण भागासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील संपर्क आणि राजकीय प्रभाव पाहता त्यांना उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांच्या कमिटीत स्थान दिले गेले नाही का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, आंदोलनावर फडणवीसांची मोठी घोषणा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम?

गेल्या काही वर्षांत नांदेड जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा, नांदेड महानगरपालिका, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रभावामुळे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले होते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नेतृत्वही अशोक चव्हाण यांच्याकडेच राहील, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात होती.

पण नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांच्या कोअर कमिटीतच चव्हाण यांना स्थान का दिले गेले नाही यावरून पक्षाच्या रणनीतीबाबत वर्तवितर्क काढले जात आहे. चव्हाण यांना ग्रामीण भागातील पक्ष संघटनेतून दूर ठेवण्यामागे पक्षाची नेमकी भूमिका काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

अशोक चव्हाण यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, प्रदेश पातळीवरून चव्हाण यांच्या ग्रामीण भागातील राजकीय अधिकारांवर मर्यादा आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा

लोहा-कंधार मतदारसंघालाही स्थान नाही

दरम्यान, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाबाबतही भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे नऊ सर्कल असतानाही कोअर कमिटीत या मतदारसंघातील एकाही पदाधिकाऱ्याला स्थान मिळालेले नाही. तसेच जिल्हा कार्यकारिणीतही या मतदारसंघातील कोणत्याही कार्यकर्त्याला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नसल्याची चर्चा आहे.

महानगरातील जबाबदारीवरूनही आश्चर्य

अलीकडच्या काळात नांदेड महानगरपालिकेची निवडणूक नसताना अशोक चव्हाण यांना महानगर कोअर कमिटीपुरते मर्यादित ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची तीन टर्म जबाबदारी सांभाळलेले राम पाटील रातोळीकर यांचाही महानगर कोअर कमिटीत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांची ग्रामीण भागातील भूमिका नेमकी काय राहणार, तसेच भाजपची स्थानिक निवडणूक रणनीती कोणाच्या नेतृत्वाखाली आखली जाणार, याकडे आता नांदेडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ashok chavan not included in nanded bjp core committee for north and south constituencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • BJP
  • Maharashtra Politics
  • Nanded

संबंधित बातम्या

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
1

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
2

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
3

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
4

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.