Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Municipal School: महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शूज, पाण्याच्या बाटल्या, गणवेश आणि इतर साहित्य खरेदी व वितरण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरवर्षी सुमारे ८ कोटी रुपयांची निविदा काढली जात असून नवकार कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची माहिती आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 12:02 PM
दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • महापालिका शाळांच्या साहित्य खरेदीत अनियमिततेचा आरोप
  • शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
  • दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा
विजय काते, मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदी आणि वितरण प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या गणवेश, शूज, पाण्याच्या बाटल्या आणि अन्य साहित्याच्या वितरणात निविदेतील अटींचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सुमारे ८ कोटी रुपयांची निविदा काढण्यात येत असल्याची माहिती आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश, शूज, पाण्याच्या बाटल्या, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. यंदाच्या साहित्य पुरवठ्याचे कंत्राट नवकार कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र, या निविदेच्या अंमलबजावणीदरम्यान विविध अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निविदेत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रकारच्या शूजची तरतूद असल्याचे सांगण्यात येते. मुलांच्या शूजला लेस, तर मुलींच्या शूजला बक्कल असण्याची तरतूद असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचे शूज देण्यात आल्याचा आरोप आहे.

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

यामुळे निविदेतील अटींमध्ये बदल करून ठेकेदाराला फायदा करून देण्यात आला का, असा सवाल उपस्थित झाला आहे. शूजचे वितरण झाले असले तरी विद्यार्थ्यांना अद्याप सॉक्स म्हणजेच पायमोजे मिळाले नसल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, सॉक्सचा प्रकार, गुणवत्ता आणि त्यासंबंधीच्या अटी निविदेत स्पष्ट नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या गेल्या चार महिन्यांपासून मिळालेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गणवेशाच्या वितरणालाही विलंब झाला असून, आता शूज आणि पाण्याच्या बाटल्यांबाबतही प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.

निविदेत स्पष्टपणे नमूद केलेल्या साहित्याचा पुरवठा न करणे किंवा निविदेतील अटींशी विसंगत साहित्य देणे हा प्रकार झाला असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठेकेदाराने निविदेतील अटींचे उल्लंघन केले असल्यास महापालिका प्रशासनाने करारातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने महापालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने संरक्षण दिले जात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करावी, दंडात्मक कारवाई करावी तसेच कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे साहित्य वेळेत आणि निविदेतील निर्धारित गुणवत्तेनुसार मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निविदेतील अटींचे उल्लंघन झाले आहे का, साहित्य खरेदी व वितरणात आर्थिक अनियमितता झाली आहे का, तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारावर कोणती कारवाई केली जाणार, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Web Title: Municipal school material purchase irregularities allegation shoes water bottles uniform distribution navkar company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • education
  • maharashtra
  • School

संबंधित बातम्या

काँग्रेस पक्षाची ‘या’ तारखेला ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’; सपकाळांसह बडे नेते होणार सहभागी
1

काँग्रेस पक्षाची ‘या’ तारखेला ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’; सपकाळांसह बडे नेते होणार सहभागी

DTE Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण योजनेत शुल्क वसुलीचा मुद्दा; ‘या’ विद्यार्थिनीला दिलासा
2

DTE Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण योजनेत शुल्क वसुलीचा मुद्दा; ‘या’ विद्यार्थिनीला दिलासा

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क
3

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र
4

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.