Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Update : पहिल्याच पावसात उल्हासनदीने ओलांडली धोक्याची पातळी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2025 | 03:14 PM
Rain Update : पहिल्याच पावसात उल्हासनदीने ओलांडली धोक्याची पातळी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

 कर्जत/ संतोष पेरणे :  तालुक्यातील उल्हास नदीला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे.नेरळ कळंब रस्त्यावरील दहीवली पुलावरून पहाटेच्या वेळी पाणी जाऊ लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.दुपारी बारा वाजता नदी मधील पाणी ओसरल्यानंतर पोलिसांनी हा पुल वाहनांसाठी पुन्हा खुला केला आहे.दरम्यान या पुलाच्या निर्मितीनंतर ४५-५० वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात उल्हास नदीला पूर आला आहे. या कमी उंचीच्या पुलाच्या बाजूला अधिक उंचीचा पुल बांधला जात असून पुलाच्या कामासाठी आणलेले क्रेन आणि जनरेटर हे महापुराच्या पाण्यात वाहून जाण्याची घटना घडली आहे.

Mansoon Update : पावसाचा कहर, उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर

खंडाळा येथील बोरघाट आणि कर्जत तालुक्याचे सीमेवर उगम पावणारी उल्हास नदीला आज पहाटे महापूर आला. काल पासून सुरू असलेला संततधार पाऊस आणि रात्री झालेली ढग फुटी यामुळे उल्हास नदीला पूर आला.या पुरामुळे कोंढाणे गावाजवळ असलेला चोची गावाकडे जाण्यासाठी असलेला लहान पुल पाण्याखाली गेला.त्यानंतर बीड गावाकडे जाण्यासाठी असलेला मोहिली पुल देखील पाण्याखाली गेला असून कर्जत शहरातील दोन भाग जोडणारा दहिवळी पायपुल हा देखील पाण्याखाली गेला होता.हे सर्व पुल आजची सकाळ होण्याआधी पाण्याखाली गेले होते.या उल्हास नदीवरील सर्वात महत्वाचा आणि साधारण ३०-४० गावांचा संपर्क असणारा माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील दहीवली पुल हा पाण्याखाली गेला.पहाटेपासून या पुलावरून पाणी जाऊ लागल्याने या पुलावरून होणारी वाहतूक कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मालेगाव आणि दहीवली ग्रामस्थांनी बंद केली होती.

Rain Update : कोकणात पावसाचा हाहाःकार; अंगावर विज पडल्याने तरुणाचा मृत्यू

मालेगाव दहिवली पुलावरून साधारण बारा वाजेपर्यंत महापुराच पाणी जात होते.त्यामुळे पोलिसांना त्या पुलाच्या पलीकडील भागात जाण्यासाठी उल्हास नदीवरील तळवडे पुलाचा वापर करावा लागला.दुपार बारा वाजता नेरळ पोलीस ठाणे यांचे अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाशी संपर्क करून पाणी ओसरल्याची माहिती दिल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला.तहसीलदार डॉ धनंजय जाधव आणि पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या समन्वय तून पुल वाहतुकीस खुला झाला.उल्हास नदीवरील दाहीवली मालेगाव येथील पुल कमी उंचीचा असून दरवर्षी पावसाळयात चार ते पाच वेळा उल्हास नदीला महापूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाते आणि त्यानंतर वाहतूक बंद होते.मात्र यावर्षी मे महिन्यात उल्हास नदीला पूर आला असून दहिवली मालेगाव पुलाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा उल्हास नदीला पूर आला आहे.

 

पुलाच्या बांधकामाचे साहित्य गेले वाहून..
नेरळ कळंब रस्त्यावर दहीवलि मालेगाव येथे उल्हास नदीवर सध्या वापरात असलेला पुल हा कमी उंचीचा आहे.त्यामुळे त्या पुलावरून दरवर्षी महापूर आल्यानंतर पाणी जाते.परिणामी तेथे जास्त उंचीचा नवीन पुल बांधण्यात यावा अशी मागणी होती.त्यानुसार २५ कोटी रुपये खर्चून अधिक उंचीचा पुल बांधण्यात येत आहे.त्या पुलाच्या कामासाठी आणलेले साहित्य अचानक झालेल्या ढग सदृश पावसामुळे आणि उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आहे.त्यात पुलाच्या कामासाठी आणलेले लोखंडी क्रेन आणि जनरेटर देखील वाहून गेले असल्याची माहिती बांधकाम खात्याकडून देण्यात आली आहे.

Web Title: Rain update ulhas river crosses danger level in first rain alert issued to villages along the river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • Badlapur
  • heavy rains
  • mansoon
  • Rain Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.