Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli doctor assault case: ‘एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?’ डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत, गेल्या ३० वर्षांत शहर आणि रुग्णालयासाठी नेमके काय केले, असा सवाल उपस्थित केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 07:18 PM
एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?' डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल

एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?' डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटील आक्रमक
  • ‘रवींद्र चव्हाणांनी शहरासाठी नेमकं काय केलं?’
  • राजू पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Dombivli doctor assault case News Marathi : डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात (Dombivli doctor assault case) डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या घटनेनंतर राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन शास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्य सुविधा, डॉक्टरांची संख्या, उपचार व्यवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध करतानाच रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

‘मारहाणीचे समर्थन नाही, पण संतापाची कारणे समजून घ्या’

राजू पाटील म्हणाले, “रमेश म्हात्रे यांनी केलेल्या कृत्याचे आम्ही कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही. कायदा हातात घेणे चुकीचेच आहे. मात्र, त्या दिवशी एका रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक अवस्था काय होती, रुग्णालयात त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले, याचाही विचार होणे आवश्यक आहे. लोकांच्या उद्रेकामागील कारणे समजून घेतली पाहिजेत.”

रवींद्र चव्हाणांवर थेट निशाणा

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट टीका करत विचारले, “एवढं मोठं प्रकरण घडलं, पण रवींद्र चव्हाण कुठे होते? सहा दिवस पाऊस होता, आज रवी दिसला; पण आमच्या डोंबिवलीचा ‘रवी’ कुठेच दिसला नाही.” राजू पाटील यांनी पुढे म्हटले की, “रवींद्र चव्हाण चार वेळा आमदार राहिले, वैद्यकीय शिक्षण मंत्रीही होते. त्यांनी या रुग्णालयासाठी नेमकं काय केलं? गेली ३० वर्षे या शहरात सत्ता असणाऱ्यांनी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा का उपलब्ध करून दिल्या नाहीत?”

‘सहा महिन्यांत आम्हालाच प्रश्न, ३० वर्षांच्या सत्ताधाऱ्यांना नाही?’

मनसे सत्तेत आल्यापासून अवघे सहा महिने झाले असतानाही सर्व प्रश्न आम्हालाच विचारले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “आम्ही केडीएमसीमध्ये सत्तेत येऊन अवघे सहा महिने झाले आहेत. आम्हाला पाच वर्षे काम करू द्या, त्यानंतर आमचा जाब विचारा. पण जे लोक तीन दशकांपासून सत्तेत होते, त्यांना कोणी प्रश्न का विचारत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शहरातील नागरी सुविधांवरही टीका

डोंबिवलीतील नागरी सुविधांवर बोलताना राजू पाटील यांनी पोस्टमार्टम केंद्र, स्मशानभूमी आणि आरोग्य सुविधांच्या नियोजनावरही नाराजी व्यक्त केली. शहराच्या मध्यभागी पोस्टमार्टम कक्ष ठेवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत, रामनगर येथील स्मशानभूमी स्थलांतरित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकरणाला राजकीय रंग

दरम्यान, डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्याचबरोबर रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजू पाटील यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण आता अधिकच राजकीय रंग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

Web Title: Raju patil slams ravindra chavan over kdmc hospital doctor assault case news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • KDMC
  • raju patil
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना मोठा धक्का! डॉक्टर मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी
1

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना मोठा धक्का! डॉक्टर मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी

‘ही तर शिंदे सेनेची गुंडशाही, केवळ FIR नव्हे, तर थेट…’, प्रियांका चतुर्वेदी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल
2

‘ही तर शिंदे सेनेची गुंडशाही, केवळ FIR नव्हे, तर थेट…’, प्रियांका चतुर्वेदी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

KDMC Hospital Assault : कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा
3

KDMC Hospital Assault : कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.