Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Metro News: गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोला हिरवा कंदील; वर्षअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता

ठाणेकरांची गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. मेट्रो ४ आणि ४अ मार्गिकेवरील या १०.५ किमीच्या टप्प्यातील सहा मेट्रो गाड्यांची सीएमआरएस सुरक्षा चाचणी यशस्वी झाली असून त्यांना सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस हा टप्पा प्रवासी सेवेत दाखल होण्याची आशा वाढली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 30, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोला हिरवा कंदील
  • वर्षाअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता
  • टप्प्याटप्याने ३९ मेट्रो गाड्या दाखल होणार
 

गायमुख कॅडबरी जंक्शन असा प्रवास मेट्रोने करण्याची ठाणेकरांची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. वडाळा- ठाणे – कासारवडवली गायमुख मेट्रो ४, मेट्रो ४अ मार्गिकवरील गायमुख – कॅडबरी जंक्शन पहिल्या टप्प्यातील गाड्यांना मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस), दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आता केवळ संपूर्ण मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास या टप्प्याच्च्या संचालनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ४ (३२.३२ किमी), मेट्रो ४ अ (२.७ किमी) मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. या मार्गिकेतील गायमुख-कॅडबरी जंक्शन असा १०.५ किमीचा टप्पा २०२५ मध्ये पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते.

सीएमआरएस चाचण्यांना सुरुवात

कामाची संथगती आणि इतर कारणांमुळे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ठाणेकरांची मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा वाढली असून याबद्दल ठाणेकरांमध्ये नाराजी आहे. पण आता मात्र हा टप्पा दृष्टिक्षेपात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या संपूर्ण मार्गिकेच्या सीएमआरएस चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. आता गायमुख कॅडबरी मार्गिकेवरील गाड्यांची सीएमआरएस चाचणी पूर्ण झाली असून ही चाचणी यशस्वी झाली आहे.

Maharashtra Security Force: पालिकेत पुन्हा खासगी सुरक्षारक्षकांचा ‘प्रवेश’; MSF चे 333 जवान हटवण्याच्या हालचाली

टप्प्याटप्याने ३९ मेट्रो गाड्या दाखल होणार

या सहा गाड्यांनाच सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून याच गाड्या आता गायमुख -कॅडबरी जंक्शनपर्यंत वर्षअखेरपासून धावणार आहेत. तर या मार्गिकेसाठी खरेदी करण्यात आलेल्या ३९ मेट्रो गाड्या ताफ्यात दाखल होताच त्यांची सुरक्षा चाचणी करण्यात येणार आहे. या गाड्यांना सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.

Child Aadhaar Update: ५ आणि १५ वर्षांच्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करा; ठाणे जिल्हा परिषदेकडून सूचना

गाड्यांची चाचणी झाल्याने सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त

गायमुख- कॅडबरी जंक्शनवर सहा मेट्रो गाड्या धावणार आहेत. त्यानुसार सहा गाड्यांची चाचणी यशस्वी झाल्याने गाड्यांसाठी सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, मेट्रो ४ आणि मेट्रो ४ अ मार्गिकेसाठी एमएमआरडीएकडून गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्या अद्याप ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे या गाड्यांची वाट न पाहता मेट्रो २ अ (दहिसर अंधेरी पश्चिम), मेट्रो ७(दहिसर गुंदवली) आणि मेट्रो ९ (दहिसर मीरा-भाईंदर) मार्गिकेतील सहा नव्या गाड्यांचा वापर गायमुख कॅडबरी जंक्शन टप्प्यासाठी केला जाणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane metro news gaymukh cadbury metro service year end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Metro
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू
1

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
2

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
3

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
4

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.