Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: मनपाच्या विकास आराखड्याला नागरिकांना विरोध; जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिकांनी केलं आंदोलन

ठाणे मनपाने नवीन विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा - खारीगांव उद्ध्वस्त होणार आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2025 | 04:23 PM
ठाणे मनपाच्या विकास आराखड्याला नागरिकांना विरोध; जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिकांनी केलं आंदोलन

ठाणे मनपाच्या विकास आराखड्याला नागरिकांना विरोध; जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिकांनी केलं आंदोलन

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे – ठाणे महापालिकेने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदच पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कळव्यातील नागरिक एकवटले आहेत. या विकास आराखडय़ाला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी ठाणे मनपाविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे.

ठाणे मनपाने नवीन विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा – खारीगांव उद्ध्वस्त होणार आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून साडेतीनशे ते चारशे इमारतींवर वरवंटा फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे 45 हजार रहिवाशी बेघर होणार आहेत. त्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्याअनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखडय़ाविरोधात रणशिंग फुंकले आहे.

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांना वेगळाच संशय

यावेळी प्रारुप विकास आराखड्यात कळवा आणि खारीगांव भागातील तब्बल 400 च्या आसपास इमारती बाधीत होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत. साधारणपणे 45 हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे, मैदाने, बाधीत होत असल्याचेही डाॅ. आव्हाड यांनी सांगितले.

Chhaava Movie पाहिल्यानंतर रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले की, “हा मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग…’

कळवा- खारीगांव येथील रहिवाशांना मारुन असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून या डी.पी. प्लानबाबत आश्वासन दिले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आपण याबाबत सरकारला जाब विचारणार आहोत, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, विरोधीपक्ष नेत्या प्रमिला केणी, माजी नगरसेवक महेश साळवी, अपर्णा साळवी आदी मंडळी उपस्थित होते.

Web Title: Thane news citizens oppose municipal development plan locals protested under the leadership of jitendra awhad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
1

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

मनपा शाळेतील मुलं ठरली अव्वल! बॉक्सिंगमध्ये मिळवला सुवर्णपदक, कामगिरी अशी की थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

मनपा शाळेतील मुलं ठरली अव्वल! बॉक्सिंगमध्ये मिळवला सुवर्णपदक, कामगिरी अशी की थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल
3

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली
4

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.