Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

शनिवार 5 सप्टेंबर रोजी गोपाळकालाचा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. बाजारपेठांमध्ये मडकी, हेडबँड आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी वाढली असून, महागाईमुळे यंदा मडक्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 04, 2026 | 09:29 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी
  • महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
  • मुलांसाठी हेडबँड, टी-शर्ट आणि छोटी मडकी उपलब्ध
गोपाळकाल्याचा सण शनिवार 5 सप्टेंबर रोजी आहे. यासाठी ठाणेनगरीत दहीहंडी उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. दहीहंडीची लहान-मोठी मडकी, बाळगोपाळांसाठी आकर्षक हेडबैंड, पताका आणि सजावटीच्या साहित्याने ठाण्यातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ठाणे शहरात जांभळी नाका, नौपाडा, राम मारुती रोडसह प्रमुख बाजारपेठांमध्ये दहीहंडीच्या मडक्यांची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे आणि कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे मडक्यांच्या किमतीत किमान ५० रुपयांची वाढ झाली आहे.

दहीहंडीसाठी लागणारी ही विशेष मडकी प्रामुख्याने गुजरातमधील सुरत येथून ठाण्यात आणली जातात. माती आणि राखेचे विशिष्ट मिश्रण करून ही मडकी तयार केली जातात. पावसाळ्याच्या दिवसांत मडकी व्यवस्थित वाळत नसल्याने एप्रिल आणि मे महिन्यांच्या कडक उन्हातच त्यांची निर्मिती सुरू केली जाते. त्यानंतर कारागीर त्यावर फैब्रिक कलर, चकाकणारे रंग आणि रंगीबेरंगी खड्यांची आकर्षक नक्षीकाम करून त्यांना अंतिम रूप देतात. बाजारपेठेत या मडक्यांची प्राथमिक किंमत १०० रुपयांपासून सुरू होत असून, आकार आणि कलाकुसरीनुसार ती पुढे वाढत जाते.

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

बाळगोपाळांच्या साहित्यालाही मोठी पसंती

केवळ मोठी मंडळेच नव्हे, तर गल्लीबोळांतील लहान बाळगोपाळांच्या दहीहंडीसाठीही खरेदीला उधाण आले आहे. ‘बोल बजरंग बली की जय’ आणि ‘गोविंदा आला रे’ लिहिलेल्या डोक्याच्या पट्ट्या, टी-शर्ट्स आणि छोट्या मडक्यांना पालकांकडून मोठी मागणी नोंदवली जात आहे.

महागाईचा फटका आकर्षक खडे तसेच रंगांनाही बसला

महागाईचा फटका सर्वांनाच बसत असताना रंगांच्या दरात वाढ झाल्याचे मडकी विक्रेत्यांनी सांगितले. रंग तयार करण्यासाठी पेट्रोलचा उपयोग होत असून ९०० रुपयांना मिळणारा रंग आता १३०० रुपयांना मिळत आहे.
तर ६०० रुपयांना मिळणारा पाच लिटरच्या थिनरचा डबा ९०० रुपयांना मिळत असल्यामुळे यंदा मडक्यांच्या भावात दरवाढ झालेली आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे ही महागाई झाल्याची माहिती मडकी विक्रेते वाशीम देवर्जी यांनी दिली. तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक खड्यांचे ही दर वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस

१०० रुपयांपासून मडक्यांची प्राथमिक किंमत सुरू

५० रुपयांची वाढ मडक्यांच्या किमतीत

मडक्यांच्या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या रासायनिक रंगांमध्ये आणि इंधन दरवाढीचा थेट फटका कारागिरांना बसला आहे. यापूर्वी २०० रुपयांना मिळणारा फैब्रिक रंग आता थेट १३०० रुपयांपर्यंत गेला आहे. सजावटीचे खाडे, मणी आणि थिनर महागल्याने यंदा मडक्यांच्या किमतीत किमान ५० रुपयांची वाढ करावी लागली आहे.

– स्थानिक मडकी विक्रेते, ठाणे

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane news thane dahi handi matki demand inflation price hike 50 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
1

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
2

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात
3

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.