Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यातील सदरबझार येथे जिल्ह्यातील पहिले हिंदू संमेलन उत्साहात! समाजाच्या एकतेवर विशेष भर

Satara येथील सदरबझारमध्ये Rashtriya Swayamsevak Sangh च्या शताब्दी वर्षानिमित्त पहिले हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनात सांस्कृतिक परंपरा, सामाजिक मूल्ये आणि हिंदू समाजाच्या एकतेवर विशेष भर देण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 08, 2026 | 07:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सातारा : Satara शहरातील सदरबझार येथील हनुमान मंदिर परिसरात Rashtriya Swayamsevak Sangh च्या शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील पहिले हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. शहरात एकूण १७ ठिकाणी हिंदू संमेलनांची मालिका आयोजित करण्यात आली असून, त्याची सुरुवात १ व २ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमाने झाली. या उपक्रमामुळे शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

कॅन्सरग्रस्तांना मिळणार नवसंजीवनी! नितीन तिवाटणे यांच्या हॉस्पिटल संकल्पासाठी सरसावले हात; नगराध्यक्षा पूजा विरकर यांचे कौतुक

या संमेलनात हिंदू समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, सामाजिक मूल्ये आणि एकोपा यावर विशेष भर देण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी ‘राष्ट्रीयत्व हा एकजिनसी समाजाचा गाभा आहे’ असे प्रतिपादन करत जाती-पातींच्या पलीकडे जाऊन समाज एकत्र येण्याचे आवाहन केले. हिंदू संस्कृतीचे जतन, परंपरांचे संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत त्यांची माहिती पोहोचवणे हे या संमेलनामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बदलत्या काळात समाजातील एकता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

१ एप्रिल रोजी सदरबझार परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत श्री हनुमान आणि महिषासुर मर्दिनी यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी सादर केलेली रूपे, भजनी व कीर्तन मंडळांचे सादरीकरण, तसेच ऐतिहासिक शस्त्रविद्येचे आकर्षक प्रदर्शन यामुळे वातावरण भारावून गेले. फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली ही शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. लहान मुलांनी विविध ऐतिहासिक महापुरुष आणि रणरागिणींची वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली. स्थानिक युवक, महिला आणि बालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

२ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात शाहीर शुभम भुतकर यांच्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांना रोमांचित केले. भक्ती डाफळे यांनी महिलांसाठी आणि युवकांसाठी केलेले मार्गदर्शन सामाजिक जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले. संत महंत परशुरामजी महाराज वाघ यांचे आशीर्वचन आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला वैचारिक दिशा मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजातील योगदान याविषयीही यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला कायदेशीर आव्हान! प्रियाताई शिंदे यांच्या ‘ओबीसी’ प्रमाणपत्रावर आक्षेप; जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

या संमेलनातून हिंदू समाजाचे ऐक्य, संस्कृतीचे रक्षण आणि सामाजिक एकत्रीकरणासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उपक्रमामुळे सातारा शहरात सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Web Title: The districts first hindu conference held with great enthusiasm at sadarbazar in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरून मालखेड सोसायटीत राडा; चेअरमनला मारहाणीनंतर सदस्यावर कोयत्याने वार
1

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरून मालखेड सोसायटीत राडा; चेअरमनला मारहाणीनंतर सदस्यावर कोयत्याने वार

मलकापूरच्या विकासाला आता जागतिक बँकेचे बळ; 30 वर्षे निधीची कमतरता भासणार नाही
2

मलकापूरच्या विकासाला आता जागतिक बँकेचे बळ; 30 वर्षे निधीची कमतरता भासणार नाही

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
3

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Mhaswad: दिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचे म्हसवडमध्ये तीव्र पडसाद! राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची भव्य निषेध रॅली
4

Mhaswad: दिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचे म्हसवडमध्ये तीव्र पडसाद! राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची भव्य निषेध रॅली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.