गडचिरोली : क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर प्रियकरानं प्रेयसीवर चाकूहल्ला (Attack) केल्याची घटना गडचिरोलीतील कोरची येथे उघडकीस आली आहे. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर या प्रियकराने स्वत: आत्महत्ता करत गळफास घेतला. या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी (Injured) झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विक्रम ग्यानसिंग फुलकवर (20) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
प्रियकाराने एवढ्यावरचं न थाबंता मुलीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या बहिणीवरही चाकूने वार केले. या घटनेचा अधिक तपास बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल नानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंभारे करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुलीला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळते.
[read_also content=”सीफूडचे आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या… https://www.navarashtra.com/lifestyle/know-the-important-health-benefits-of-seafood-nrrd-312555.html”]
कोरची मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या टेंमली गावातील मुलाने बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गावातील 17 वर्षीय मुलीच्या मानेवर चाकूने 12-13 वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीचे आणि विक्रमचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. याच प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये वाद झाला आणि विक्रमने चाकूने मुलीवर सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली. यावेळी मुलीला वाचवण्यासाठी तिची बहिण मधे पडली असता तरुणाने तिच्यावर चाकून वार केले आणि तेथून पसार झाला. मुलींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी दोन्ही मुलींना कोरची रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
[read_also content=”घरगुती वादातून माहेरी जाणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक https://www.navarashtra.com/maharashtra/gang-rape-of-a-woman-who-was-returning-home-two-accused-were-arrested-crime-nrps-312532.html”]