मुंबई : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण (75 years of Indian independence) होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या (Central Government) मार्गदर्शक सुचनांनुसार देशभरात दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar tiranga) उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबई महानगरात (Mumbai City) देखील हा उपक्रम राबवला जाणार असून, त्यादृष्टीने प्रशासनातील सर्व संबंधित विभागांना नेमून दिलेली कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा (Ashish Sharma) यांनी दिले आहेत. तसेच सर्व मुंबईकरांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने व हिरीरीने भाग घ्यावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्या (Municipal Administration) वतीने शर्मा यांनी केले आहे.
[read_also content=”बेस्टचे ई-बस कंत्राट रद्द करा, आमदार आशिष शेलार यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/cancel-best-e-bus-contract-mla-ashish-shelar-request-to-deputy-chief-minister-devendra-fadnavis-304667.html”]
दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारकांचे तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार देशभरात दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.