• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Cm Devendra Fadnavis Statement After Ritu Tawde Mayor In Bmc Maharashtra Politics

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

महानगरपालिका ही लोकशाहीचे अंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तेथे प्रशासक होते. तेथे लोकप्रतिनिधींचे लोकशाहीला अपेक्षित राज्य प्रस्थापित झाले याचा मला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 08:32 PM
“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
महापौर, उपमहापौर सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करतील- फडणवीस 
गेल्या साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना – एकनाथ शिंदे

मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतील. त्यांना पूर्ण ताकद देण्याचे काम आम्ही करू. त्यांच्या माध्यमातून नवीन मुंबई घडविण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रितू तावडे यांच्याकडे एक अनुभवी व अस्सल मराठी चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या प्रश्नांकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने सुरू केलेला मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महापालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. उपमहापौर संजय घाडी यांच्या अनुभवाचा फायदा महापालिकेला मिळेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचे प्रशासन महापालिकेच्या माध्यमातून चालविले जाईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेवर फडकला भाजपा-महायुतीचा भगवा!🚩 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने बदल घडवून आणला आणि एक लोकाभिमुख, पारदर्शी असे भाजपा महायुतीचे सरकार निवडून दिले. आज भाजपाच्या रितूताई… pic.twitter.com/znLLsGETNP — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 11, 2026

महानगरपालिका ही लोकशाहीचे अंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तेथे प्रशासक होते. तेथे लोकप्रतिनिधींचे लोकशाहीला अपेक्षित राज्य प्रस्थापित झाले याचा मला आनंद आहे. जनसामान्यांना आपले लोकप्रतिनिधी अधिक जवळचे वाटतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो. अशा प्रकारे मी पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. अशा ऐतिहासिक व वारसा असलेल्या वास्तूमध्ये महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होणे हे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अतिशय कार्यक्षम महापौर व उपमहापौर मिळाले आहेत. गेल्या साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. त्या कामाची पोचपावती मुंबईकरांनी दिली. विकासाला प्राधान्य व विकासाला मुंबईकरांनी स्वीकारले आहे. मुंबई जागतिक दर्जाचे शहर करण्याची भूमिका आहे. मुंबई शहरासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचे काम आम्ही करू. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करणार. त्यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मुंबई खड्डेमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त करण्याची आमची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे काम शासन करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Cm devendra fadnavis statement after ritu tawde mayor in bmc maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • BMC
  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
1

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?
3

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

पुरंदर विमानतळ ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, अजितदादांनी सांगितलेल्या 3 निर्णयांवर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब
4

पुरंदर विमानतळ ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, अजितदादांनी सांगितलेल्या 3 निर्णयांवर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Feb 11, 2026 | 09:48 PM
बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

Feb 11, 2026 | 09:41 PM
Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Feb 11, 2026 | 09:39 PM
Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Feb 11, 2026 | 09:16 PM
Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Feb 11, 2026 | 09:07 PM
ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

Feb 11, 2026 | 08:47 PM
“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

Feb 11, 2026 | 08:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.