माढा आमदार अभिजीत पाटील (फोटो- ट्विटर)
बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूरपणे आपल्या मतदार संघातील विकासासह राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, महादेव कोळी, मुस्लिम या विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे.
हेही वाचा: मनोज जरांगे पाटील पुन्हा ॲक्शनमोडवर! नवीन वर्षातील आमरण उपोषणाची थेट तारीख केली जाहीर
आगामी २५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. परंतु या आंदोलनाच्या इशाराकडे सरकारने गांभीर्याने पहिले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आमदार अभिजीत पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. यामुळेच सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचे काम खुद्द अभिजीत पाटील यांनी केले आहे. यामुळेच मराठा समाजाला दिलेल्या शब्द पाळण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरु झाला असल्याचे स्पष्ट दिसले आहे.
माढा मतदार संघातील माढा शहरमध्ये दहा दिवसातून पाणी मिळते. याबाबत उजनी धरण या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का? असा प्रश्न मांडत हा पाणी प्रश्न सोंडविण्याबाबत मागणी केली आहे. सरकारने शहरा बरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलली पाहिजे. याकरिता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडनिंब येथील एमआयडीसीला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असेही सांगितले. यासह विविध प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी आवाज उठवीत आपण माढा मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेवून जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
एम एस पी वाढविण्यासाठी पाठपुरावा व्हावा