चांदूर बाजार : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाची (Pond in the field) परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Huge loss to farmers) झाले असल्याची तक्रार तहसिलदारांकडे करण्यात आली.
जवळा ते सरफाबाद (javala to Sarfabad ) या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाची कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे पावसाचे आलेले संपूर्ण पाणी शेतामध्येच साचले आहे. सरफाबाद येथील शेतकरी रणजीतसिंग रघुवंशी (Farmer Ranjit Singh Raghuvanshi) यांच्या दहा एकर शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. या नुकसानाला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
कोणतेही काम चालू असताना कामावर लक्ष देण्याची जबाबदारी ही संबंधित अभियंत्याची ( Engineer) असते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मात्र, कंत्राटदाराच्या (contractor) कामाकडे दुर्लक्ष करतात किंवा काम चालू असताना त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कंत्राटदारांना रान मोकळे असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदारांचा घाईघाईने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे काम योग्य की अयोग्य याकडे लक्ष न देता काम पूर्ण झाल्याचे दाखवून देयके काढली जातात. अशाच कारभारामुळे सरफाबाद ते जवळा या रस्त्यावर असणारे शेतकरी रघुवंशी यांच्या शेतात पाणी शिरुन नुकसान झाले आहे.