indian airports (3)
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील औरंगाबाद विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. येथून सुटणाऱ्या विमानांना प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील अनेक प्रवासी येथूनच विमान प्रवास करत आहेत. याशिवाय खान्देशातील विमानप्रवासीही येथून उड्डाण घेत आहेत.
हेदेखील वाचा : 43व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन; सुमित नागल, रोहन बोपन्ना यांसारख्या अव्वल भारतीय टेनिसपटूंचा सहभाग
गेल्या काही वर्षात प्रवाशांची वाढ झाली आहे. यातील अनेकांना पुणे किंवा मुंबईला जाऊन पुढील प्रवास करावा लागत होता. मात्र, आता अनेक जण हे औरंगाबाद विमानतळावरून प्रवास करत आहेत. गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रके परदेशात तसेच देशांतर्गत विमानांच्या उड्डाण करणाऱ्या वेळेच्या नियोजनानुसार योग्य असल्याने याचा थेट लाभ प्रवाशांना होत आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करून पुणे किंवा मुंबई, दिल्ली, हैदराबादसह अहमदाबाद, बंगळूरू आदी शहरांसाठी जाणाऱ्या विमानप्रवासांच्या संख्येत वाढ होत आहे.
यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत या विमानतळावरून तब्बल ३ लाख ३७ हजार ६९६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षीच्या सहा महिन्याच्या तुलनेत प्रवाशी संख्या ही १४ टक्क्यांनी वाढलेली आहे. सप्टेंबर महिन्यात विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत १६.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सेवेचा अभाव
चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेसाठी सौदी अरेबियासाठी आंतरराष्ट्रीय विमान चालविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी एकही विमान चिकलठाणा विमानतळावरून गेले नाही. गेल्या वर्षी चिकलठाणा विमानतळावरून ३७१५ विमान प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा एकही विमान न गेल्याने, प्रवाशी संख्या शून्य राहिली आहे.
प्रश्न मार्गी लावावा
देशांतर्गत प्रवाशांची संख्या वाढणे हे येथील उद्योग विकासासाठी सकारात्मक आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानांच्याअभावी विकासास बाधा येत आहे. येथे कार्गो सेवा सुरू होणे आवश्यक आहे. विमानतळ विस्ताराचा प्रश्र नविन सरकारने तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे, अशी मागणी सध्या प्रवाशांकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा : Pune News: विजयानगर कॉलनीतील ‘ती’ जागा ट्रस्टकडे; महापािलकेची ‘ओपन’स्पेस’ परत मिळविण्यासाठी धावाधाव