Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच जाणार; पण त्यावर जयंत पाटील म्हणतात…

विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA) आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2023 | 07:17 AM
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच जाणार; पण त्यावर जयंत पाटील म्हणतात…
Follow Us
Follow Us:

मुंबई : विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA) आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते पदाबाबत अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत योग्य निर्णय होईल, असेही ते म्हणाले. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून, त्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून सहमती दर्शवली आहे. काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार नावांची जोरदार चर्चा आहे.

या नावांची सर्वाधिक चर्चा

काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा केल्यास या पदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी राहणार आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार असून, त्यात बदल होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

विरोधी पक्षांशी चर्चा विचारविनिमय करणार

आमदारांची संख्या पाहिली तर विरोधी पक्षनेते पदावर दावा करणे योग्य नाही. ज्या पक्षाकडे जास्त आमदार आहेत, त्यांच्या पाठिंब्याशिवाय विरोधी पक्षनेता काम कसे करणार? आमच्यातून बाहेर गेलेले लोक फुटले आहेत, असे सांगत नाहीत. विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. कागदावर आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. पण आमच्यातील 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांशी चर्चा विचारविनिमय करावा लागेल.

– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: The opposition leader will change in maharashtra assembly congress will gets the post nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2023 | 07:17 AM

Topics:  

  • jayant patil
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Ncp Mla
  • Opposition Leader
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.