
दुर्मीळ रक्तपुरवठ्याचा प्रश्न गंभीर! नवजात बालकासाठी रक्ताच्या आवाहनाने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
केईएम रुग्णालयातील अवघ्या दोन दिवसांच्या नवजात बालकासाठी ओ निगेटिव्ह पीसीव्ही आणि एफएफपी रक्तघटकांची तातडीची गरज निर्माण झाल्यानंतर रक्तपेढ्या, डॉक्टर आणि सामाजिक संस्थांच्या व्हॉट्सअॅप गटांवर मदतीचे संदेश फिरू लागले.या घटनेमुळे मुंबईसारख्या महानगरात दुर्मीळ रक्तगटासाठी अजूनही सोशल मीडियाच्या आवाहनांवर अवलंबून राहावे लागते का, असा प्रश्न उपस्थित झाला या पार्श्वभूमीवर रक्तसुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील यंत्रणेची क्षमता पुन्हा चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य – istock)
अमराठी चालकांचा व्यवहारिक मराठी शिकण्याकडे उत्स्फूर्त कल : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
राज्य रक्त संक्रमण परिषदेची जबाबदारी राज्यातील रक्ताच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवण्याची आहे. यासाठी मनुष्यबळ, रक्तसाठा, रक्तदात्यांच्या अद्ययावत याद्या आणि दुर्मीळ रक्तगट दात्यांचे नेटवर्क सतत सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारी रक्तपेढीतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक रक्तपेढीतील सामाजिक कार्यकर्ते दुर्मीळ रक्तगट दात्यांची स्वतंत्र यादी राखून ठेवतात. गरज पडल्यास या दात्यांशी संपर्क साधला जातो. मात्र प्रत्यक्षात ‘ए’ निगेटिव्ह आणि ‘ओ’ निगेटिव्हसारख्या रक्तगटांची सध्या टंचाई असल्याचे समोर येत आहे. एसबीटीसीच्या पोर्टलवर दररोज सकाळी दहा वाजता उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती अद्ययावत केली जाते, मात्र संबंधित रक्तपेढीकडून रक्त उपलब्ध करून दिले जाईल की नाही, हे स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते.
वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बालकांच्या बाबतीत नवजात रक्तपुरवठ्यातील विलंब गंभीर परिणाम घडवू शकतो. त्यामुळे दुर्मीळ रक्तगटांसाठी केवळ नोंदणी नव्हे, तर कार्यक्षम आणि तत्पर प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्याची गरज आहे.रक्तदान शिबीर समन्वयक नीलेश घारे यांच्या मते त्या नेहमीच प्रभावी ठरतील याची हमी नसते. यादीतील दात्यांशी संपर्क साधल्यानंतर ते प्रत्यक्ष रक्तदानासाठी येतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे केवळ यादी पुरेशी नाही. अधिकाधिक रक्तदान शिबिरे आणि नियमित रक्तदान हाच दीर्घकालीन उपाय आहे,’ असे त्यांनी सांगितले.