Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार, माणगाव–इंदापूर बायपासमुळे कोकणवासियांना मिळणार दिलासा; सुनील तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव–इंदापूर परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या बायपासच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 14, 2026 | 12:44 PM
Raigad News : वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार, माणगाव–इंदापूर बायपासमुळे कोकणवासियांना मिळणार दिलासा; सुनील तटकरे यांनी दिली माहिती
Follow Us
Close
Follow Us:
  • माणगाव–इंदापूर बायपासमुळे कोकणवासियांना मिळणार दिलासा;
  • वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार,
अलिबाग : मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव–इंदापूर परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुरू असलेल्या बायपासच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे . कोकण रेल्वे, वनविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग मंदावला होता. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता, रेल्वे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही तांत्रिक अडचणी दोन दिवसांत, काही 15 दिवसांत तर उर्वरित अडचणी एका महिन्याच्या आत दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. परिस्थिती अनुकूल राहिल्यास येत्या 1 जूनपर्यंत या बायपासमार्गावर वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, रिलायन्सच्या विस्तारीकरणामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावरही बैठकीत चर्चा झाली. तसेच गेल (GAIL) कंपनीचा उसर परिसरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सागरी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनाच्या अडचणी सोडवण्यासाठीही संबंधित अधिकारी, प्रकल्प प्राधिकरण आणि स्थानिक नागरिकांची बैठक घेण्यात आली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावून काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.याशिवाय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Karjat News : युद्धामुळे इंधन पेटलं; LPG सिलेंडरसाठी पोलीस बंदोबस्त, नागरिकांच्या लांबच लांब रांगा

दादर गावातील जमीन संपादन आणि पाणीपुरवठा योजनेवर मोठा खर्च होऊनही पाणी प्रत्यक्षात पोहोचले नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, केंद्र सरकारचे मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी करण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना तटकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीपूर्वीच युती केली होती आणि जनतेने त्यांना बहुमत दिले. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिल्यामुळे लोकशाही पद्धतीने सत्ता स्थापन करण्याचा अधिकार आमच्याकडे होता. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन केली. हा दिवस जनतेची सेवा करण्यासाठी मिळालेला चांगला दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियावर फिरत असलेल्या “काळा दिवस” या पोस्टबाबत आपण अनभिज्ञ असल्याची कबुलीही त्यांनी दिली.लोकशाही व्यवस्थेत पदाधिकारी आणि अधिकारी या दोघांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगताना तटकरे म्हणाले की, लोकशाही ही दोन चाकांवर चालते—पदाधिकारी आणि प्रशासन. पदाधिकारी नसतील तर प्रशासन आपल्या पद्धतीने काम करू लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात संसदीय लोकशाही व्यवस्था आहे आणि कोण सत्तेत यावे हे ठरवण्याचा अधिकार जनतेकडेच आहे.

Raigadh ZP News:रायगड जिल्हा परिषदेत ‘सव्वा-सव्वा’ वर्षांचा फॉर्म्युला; भाजप-राष्ट्रवादीला सुरुवातीची संधी, शिवसेना प्रतीक्षेत

Web Title: The problem of traffic congestion will be solved the people of konkan will get relief due to mangaon indapur bypass sunil tatkare gave information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Mangaon
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी
1

Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी

Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?
2

Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.