फोटो सौजन्य: गुगल
यंदाने पावसाने दरवर्षीपेक्षा आधीच राज्यात आगमन केलं आहे. दरवर्षीच्या पावसात अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे रेल्वे यंत्रणा अनेकदा कोलमडून पडते. याचपार्श्वभूमीवर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मान्सून वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. मान्सून वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वे अत्याधुनिक यंत्रणांसह पावसातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे असं कोकण रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ,त्याचप्रमाणे वाहतूक नियंत्रण आणि प्रवासी सुविधांचा दर्जा या तिनही सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
यंदाच्य़ा पावसाळ्यात रेल्वे वाहतूकीवर कोणताही गंभीर परिणाम होणार नाही, यासाठी बेलापू, रत्नागिरी आणि मडगाव या ठिकाणी कोकण रेल्वेच्या वतीने नियंत्रण कक्ष तयार करण्यात आली आहे. नवी मुंबई बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोकण रेल्वेच्या अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे या सुविधांबाबत माहिती दिली आहे. मुंबई गोवा रेल्वे वाहतूकीदरम्यान पावसाळ्यात दरड कोसळणं, रेल्वे पुलावर पाणी साचणं या सगळ्या समस्यांमुळे कोकण रेल्वेचा प्रवास हा कठीण होत जातो. यंदाही याच समस्या उद्भवल्या तरी आता नव्या यंत्रणेसह कोकण रेल्वे आव्हानांसाठी सज्ज आहे.
पावसाची सुरुवात झाली असून 15 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंतचे मान्सून वेळापत्रक जाहीर केलं आहे. या संबंधत कालावधीत हवामानाचा अंदाज घेत कोकण रेल्वेच्या गती बाबत योग्य निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोर अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीवर उपाय योजना करण्यासाठी कोकण रेल्वे सर्व यंत्रणांनिशी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज झाली आहे.
मान्सूनच्या काळात कोकण रेल्वेच्या वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. याचपार्श्वभूमीवर जर एका दिवसात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला तर तात्पुरती कोकण रेल्वेसेवा बंद करण्यात येणार आहे. तसंच रेल्वेमार्गावरील अतिरिक्त संवदेनशील 365 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय रत्नागिरी चिपळूण आणि कणकवली भागात यंत्रसामग्री सज्ज करण्य़ात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रवाशांना http://www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर आणि हेल्पलाइन क्रमांक 139 वरून रिअल टाइममध्ये मिळू शकते, असं पत्रकार परिषेद कोकण रेल्वेकडून नमूद करण्यात आलं आहे.