राज्याला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- सोशल मिडिया)
राज्यात पावसाचा जोर वाढला
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले
30 तारखेपर्यंत समुद्र खवळलेला राहणार
Kokan Rain Alert: गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासाठी पुढचे तीन दिवस आँरेज अलर्ट देण्यात आला आहे.
कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यन्त समुद्र खवळलेला राहणार आहे. किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याकही शक्यता आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. सकाळपासून पावसाचा जोर जिल्ह्यात वाढला आहे.
Maharashtra Rain Alert: पुढील 48 तास घरातच थांबा! राज्यावर वरूणराजा कोपणार; ‘या’ जिल्ह्यांत चिंता वाढली
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील नद्या नाले तुडुंब वाहत आहेत. पाणी पातळीत वाढ झाली आहे. खैराट गावातील ओढा ओव्हर-फ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडाऱ्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस
मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पावसानं अक्षरश: झोडपून काढले. विजांच्या प्रचंड गडगडाटासह सुमारे दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसानं तुमसर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला.
मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ४८ तास राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून सर्व शाळा आणि कॉलेजांना सुट्टीची माहिती दिली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने हाहाकार माजवला आहे. पुढील दोन दिवस राज्यभर अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने ही खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी गावात सतत मुसळधार पावसामुळे ठाकूरसिंग राठोड यांचे घर आज सकाळी कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.