Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अन्यथा संघर्ष अटळ; सोलापुरातील रिक्षा चालक संघटना आक्रमक

रिक्षा फिटनेससाठी ६०० रुपयांची ही विलंब शुल्क आज हजारो रुपयात जाऊ लागली आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2024 | 02:52 PM
…अन्यथा संघर्ष अटळ; सोलापुरातील रिक्षा चालक संघटना आक्रमक
Follow Us
Follow Us:

सोलापूर : रिक्षा फिटनेससाठी ६०० रुपयांची ही विलंब शुल्क आज हजारो रुपयात जाऊ लागली आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला.

या मोर्चाच्या अग्रभागी माजी आमदार नरसय्या आडम, रियाज सय्यद, प्रकाश आळंदकर, अजीज खान, सलीम मुल्ला, प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले. संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रदेश वाहतूक महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले, ‘‘संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरु झाल्यानंतर ही बाब रिक्षा चालकांना २१ मे २०२४ रोजी माहित झाली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी याविषयी बैठक घेऊन शासनास कळविण्याचे आश्वासन देऊन आपले हात झटकले. म्हणून सर्वसमावेशक विचार करून सर्व संमतीने २९ जून रोजीच्या मेळाव्यात निर्णय घेतल्याप्रमाणे आज मोर्चा काढत आहोत. जर मागणी मान्य नाही झाली तर १६ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालून त्यांच्याकडे याबाबात मागणी करणार आहोत.’’

आळंदकर म्हणाले, शासनाचे वाहतुकीबाबतचे धोरण हे मोठ्या वाहनाच्या व्यवसायावर करत असल्याने तुलनेने व व्यवसायाने छोटे असलेले रिक्षा चालक यामध्ये भरडले जात आहेत. मागील आंदोलनाची आठवण करून देत रिक्षा चालक एकदा जिद्दीला पेटला तर तो आपली मागणी केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. हा इतिहास असून परत एकदा नवीन इतिहास घडविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

…अन्यथा संघर्ष अटळ

आडम म्हणाले की, रिक्षा चालकांची परिस्थिती कथन करत अनेक मोठ्या-मोठ्या उद्योगपतींना करोडो-अरबो रुपयांची कर्ज माफी शासन देत असताना मात्र दिवसाचे १२-१२ तास राबून अहोरात्र प्रवाशी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना फिटनेससाठी दररोज ५० रुपये प्रमाणे दंड आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत. जोडीला ट्राफिक पोलीस असून रस्त्यावरून वाहन चालविताना त्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. पंढरपूरच्या विठोबाने शासनास सुबुद्धी दिलीतर हा अन्यायकारक जुलमी दंड रद्द करतील, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: The rickshaw pullers association in solapur is aggressive nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Riksha

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली
2

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक; झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला
3

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक; झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला

Amravati News: विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम
4

Amravati News: विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.