फोटो सौजन्य - Social Media
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आकर्षक परेड संचलन सादर करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर कुस्ती, योगा, जंपरोप, मल्लखांब, लाठीकाठी, कराटे आदी विविध खेळप्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली, ज्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. या सोहळ्यास उद्योजक गौरव रुग्गे, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नितीन पडियार, ग्रामपंचायत बाचणीचे लोकनियुक्त सरपंच एम. डी. कांबळे, संस्थेच्या सचिव व वारणा सहकारी बँकेच्या संचालिका सुवर्णा माने, संस्था खजिनदार बापूसो माने, मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील, कॅप्टन सुरेश आडसूळ, जिमखाना विभाग प्रमुख आनंद पाटील, क्रीडा महोत्सव प्रमुख सुजित पाटील, दिशा क्रीडा महोत्सव प्रमुख प्रतिक्षा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अजित पाटील यांनी इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यश निश्चितच मिळते, असे सांगत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने परिश्रम करण्याचा मौलिक सल्ला दिला. तर पैलवान अमृत भोसले यांनी परिस्थितीचा बाऊ न करता गुरूंवर विश्वास ठेवून मेहनत करणारे विद्यार्थीच विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करतात, असे मत व्यक्त केले. संस्थेच्या वतीने चौफेर शिक्षण, शिस्त, क्रीडा आणि संस्कार यांचा समन्वय साधणाऱ्या या शिक्षण संकुलाबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र माने यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना क्रीडासह शिक्षणातही उज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.






