Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच असल्याची भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2026 | 02:39 PM
पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:

मुंबई : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडविला. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच असल्याची भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत एसटीने २१ हजार ५२७ फेऱ्यांद्वारे  ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

याबाबत सरनाईक म्हणाले, “गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. त्यांच्या या भक्तिमय प्रवासाचा एक छोटासा भाग होण्याचे भाग्य आपल्या लालपरीला दरवर्षी लाभते. एखाद्या भाविकाला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला सुखरूप पोहोचवणे आणि दर्शनानंतर त्याला सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे, ही केवळ प्रवासी वाहतूक नाही; ती एसटीच्या माध्यमातून घडणारी विठ्ठलसेवाच आहे.”

” प्रवासी देवो भव: “

राज्यातील विविध विभागांतून आलेल्या बसेस, चालक-वाहक तसेच यांत्रिक, सुरक्षा आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या यात्रेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. भाविक – प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ देत प्रचंड गर्दी, वाहतुकीचा ताण आणि हजारो फेऱ्यांचे नियोजन केले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. अशाच प्रकारे संपूर्ण राज्यातील प्रवासी हा आपला ‘ विठुराया ‘ आहे, असे मानून प्रवासी देवो भव: या भावनेतून  एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने आपली  सेवा बजावावी असे आवाहन या निमित्ताने मंत्री सरनाईक यांनी केली आहे.

“वारीत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या पावलात जशी विठ्ठलभक्ती असते, तशीच या लाखो भाविकांची सेवा करणाऱ्या एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात मला विठ्ठलसेवा दिसते. आपल्या घरातील सण-उत्सव बाजूला ठेवून दिवस-रात्र सेवा देणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, अधिकारी आणि पडद्यामागे कार्यरत प्रत्येक हाताचे मी मनापासून अभिनंदन करतो. ९ लाखांहून अधिक भाविकांना सुखरूप त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणे, हेच आपल्या एसटी परिवाराने विठुरायाच्या चरणी अर्पण केलेले सेवेचे पुष्प आहे,” असे सरनाईक यांनी सांगितले.

एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतूक करणारी संस्था नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. पंढरीच्या वारीत लाखो भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुरक्षित प्रवासानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हीच एसटीच्या सेवेची खरी कमाई आहे, असेही सरनाईक यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

“विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेल्या प्रत्येक भाविकाला सुरक्षितपणे पंढरीपर्यंत नेणे आणि पुन्हा सुखरूप घरी पोहोचवणे, हे आमचे कर्तव्यही आहे आणि भाग्यही. ‘लालपरी’ची ही लोकसेवेची परंपरा भविष्यात अधिक सक्षमपणे पुढे नेऊ,” असा विश्वासही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Web Title: The st corporation has generated revenue worth crores of rupees from the pandharpur wari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pratap Saranaik
  • st bus

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
2

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
4

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.