मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे शिवसेनेसोबत म्हणजे ठाकरे गटासोबत युती करणार असल्याची मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होती. अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून ठाकरे गटासोबत युतीची घोषणा केली आहे. त्यामुळं आता आगामी निवडणुकांमध्ये भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र लढताना दिसणार आहे. वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे दोघे पंधरा दिवसांपूर्वी एका व्यासपीठावर आले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर आज युतीची घोषणा झालेली आहे. मात्र वंचित व ठाकरे गटाच्या युतीवर शिंदे गटाने टिका केली आहे.
[read_also content=”आता भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र लढणार… वंचित बहुजन आघाडीकडून ठाकरे गटासोबत युतीची घोषणा https://www.navarashtra.com/maharashtra/vanchit-bahujan-aghadi-announces-alliance-with-thackeray-group-349549.html”]
दरम्यान, शिंदे गटाने बंड केल्यानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. दररोज कोणतरी ठाकरे गटाला रामराम करत आहे. त्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळं सध्याच्या परिस्थिती ठाकरे गटाला कोणाच्या तरी आधाराची गरज होतीच, म्हणून त्यांनी वंचित बरोबर युती केली आहे, ठाकरे गट एकटा पडला होता आता त्यांना वंचितच्या रुपाने आधारा मिळाला आहे. ज्या आधाराची त्यांना गरज होती असा टोला मंत्री व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला आहे. दरम्यान ठाकरे गट व वंचित युती झाल्यामुळं याचा फायदा दोघानाही होईल. त्यामुळं आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं कशी असतील, नवा गडी नवं राज्य याप्रमाणे ठाकरे गटासोबत आता प्रकाश आंबेडकर देखील दिसतील, तसेच आगामी निवडणुकांमध्ये भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र लढताना दिसणार आहे.