Photo Credit- Social media
नवी दिल्ली: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यात राजकारण तापलं आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर भाष्य करत महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे. “राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा बांधताना त्यात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर शंभर टक्के पडला नसता. पण पुतळा उभारणीतच निष्काळजीपणा झाल्याने तो कोसळला असावा, ” असे सूचक विधान नितीन गडकरी यांनी केले आहे. तसेच,समुद्रकिनाऱ्याच्या 30 किलोमीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यात स्टेनलेस स्टिलचा वापर करावा लागतो. स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही, त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या परिरात कोणतेही बांधकाम करताना त्यात स्टेनलेस स्टीलचा वापर करणे गरजेचे असते, असे कारण त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
हेदेखील वाचा: विधानसभा निवडणुकांचा मुहुर्त ठरला; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले सूचक संकेत
दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ” पुतळ्याचे पाच टनांचे वजन पेलण्यासाठी आवश्यक धातूचा वापर केला गेला होता का, आधारासाठी साधे पोलाद वापरल्यास तो गंजण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे त्यासाठी 316 रोडचे स्टेनलेस स्टील वापरले जाते, मग महाराजांच्या पुतळ्यासाठी कोणता धातू वापरण्यात आला. महाराजांच्या पुतळ्याच्या धातूची जाडी सरासरीपेक्षा जास्त होती.
पुतळ्याचा आतील आधार हा अधिक भक्कम हवा असतो. तो तसा होता का, १५ दिवसांत पुतळ्याच्या धातुचे काम पुर्ण होऊन उभारणी सुदधा झाली, इतका कमी वेळ मिळणे हेदेखील तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. याची कल्पना आयोजकांना होती का, असे अनेक प्रश्न नितीन गडकरी यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, मुंबईत कितीही चांगले काम करा, पण समुद्राच्या बाजुला असलेल्या इमारतींना लगेच गंज चढतो. त्यासाठी कोणते मटेलिअल वापरायचे, त्याची कॉस्ट इफेक्च काय आहे. याकडेही नितीन गडकरींनी लक्ष वेधले.
हेदेखील वाचा: Travel: जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे
दरम्यान, गडकरींच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. नितीन गडकरी केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. एखादे काम हातात घेतले तर त्यात ते बारकाईने काम करतात. कामाचा दर्जा चांगला राहिल याकडेही त्यांचे लक्ष असते. त्यासाठी ते योग्य ती काळजीही घेतात. देशातील रस्ते सुधारण्यांच्या कामात नितीन गडकरींचे मोठे योगदान आहे. हे मी अनेकदा संसदेतही सांगत असतो. त्यात राजकारण आणण्याच काही प्रश्नच येत नाही. पण त्यांनी पुतळ्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले असेल तर जाणकारांकडून सल्ला घेऊनच बोलले असतील, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.