भारतात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील अनेक वास्तूंचा इतिहास फार जुना आणि चमत्कारी आहे. भारतात आपल्याला अनेक वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. प्रत्येक मंदिराचा आपला असा एक वेगळा आणि जुना इतिहास असतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अशा मंदिराबाबत सांगणार आहोत, जे फार प्राचीन आणि आपल्या चमत्कारी गुंणांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. हे मंदिर हिंदू धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान मानले जाते.
आज आम्ही तुम्हाला राधा-कृष्णाच्या चमत्कारी मंदिराविषयी सविस्तर सांगत आहोत. तसे पाहायला गेले तर भारतात राधा-कृष्णाची शेकडो वर्षे जुनी मंदिरं पाहायला मिळतील, ज्यांना नष्ट करण्यासाठी मुघलांनी यावर आक्रमण केले होते. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे असे एक मंदिर आहे, जिथे दर्शन घेतल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनासाठी येत असतात.
हेदेखील वाचा –चवीसाठी नाही तर या आजाराच्या उपचारासाठी बनवले गेले होते चाट! पदार्थाचा आंबट-गोड इतिहास जाणून घ्या
राधा-कृष्ण मंदिराचे पुजारी विजय कुमार उपाध्याय यांच्या सांगण्यानुसार, हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने आहे. अनेक चमत्कारही इथे पाहायला मिळतात. पुजाऱ्याने सांगितले की, 1662 मध्ये भारतात मुघल राजवटीत या मंदिरावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. पण, मंदिर पाडता आले नाही. त्यावेळच्या कुऱ्हाडीच्या खुणा इथे आजही पाहायला मिळतात.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या
पुजारी यांनी पुढे सांगितले की, शहरात हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. शहरात कोणताही शुभ कार्य सुरु झाला की, भाविक प्रथम या मंदिरात येऊन येथील राधा आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेतात. इतकेच नाही तर शहरातील कोणत्याही उत्सवाची सुरुवात या मंदिरापासून सुरू केली जाते. शहरातील कोणत्याही उत्सवाची मिरवणूकही याच मंदिरातून सुरू केली जाते. याच कारणामुळे इथे नेहमीच भाविकांची गर्दी पाहायला मिळते.