Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी संसदेत कडक कायदा करावा : संभाजीराजे छत्रपती

मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना ही निंदनीय व चिड आणणारी आहे. महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी देशातील खासदारांनी संसदेत कडक कायदा करावा, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तसेच सदर आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2022 | 08:09 PM
महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी संसदेत कडक कायदा करावा : संभाजीराजे छत्रपती
Follow Us
Close
Follow Us:

लोणावळा : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना ही निंदनीय व चिड आणणारी आहे. महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी देशातील खासदारांनी संसदेत कडक कायदा करावा, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तसेच सदर आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली आहे.

शिवक्र‍ांती कामगार संघटनेचा कामगार मेळावा आज लोणावळ्यात पार पडला. या मेळाव्याला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अँड. विजयराव पाळेकर, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विनोद साबळे, संघटनेचे खजिनदार रविंद्र साठे, चिटणीस गुलाबराव मराठे, चिटणीस ब्रिंदा गणात्रा, संघटक रमेश पाळेकर, प्रतिक पाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, समाजातील कष्टकरी, कामगार, शेतकरी अशा विस्थापितांना सोबत घेऊन स्वराज्याचे सुराज्य करायचे आहे. तुळजापूर येथे स्वराज्य संघटनेची स्थापना होणार असून त्याची पायाभरणी लोणावळा शहरातून झाली असल्याचे उद्गार संभाजीराजे यांनी काढले. पुढे छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मी छत्रपती घराण्याचा वारसदार असलो तरी जनतेच्या व समाजाच्या कल्याणासाठी विविध राजकीय पक्षांकडे गेलो, मात्र ज्याप्रमाणे साडेतीनशे वर्षापुर्वी प्रस्थापितांनी छत्रपती शिवाजी राजे यांची अवहेलना केली. तोच अनुभव मलाही अनुभवायला मिळाली. राजेंनी त्याकाळी विस्थापितांसाठी स्वराज्याची निर्मिती केली. त्याच पद्घतीने समाजातील विस्थापितांना सोबत घेऊन स्वराज्याचे सुराज्य करण्याचे स्वप्न मी बाळगले आहे.

शिवक्र‍ांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अँड विजयराव पाळेकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला शिवक्रांतीचा प्रत्येक कामगार साथ देईल तसेच माजी दोन्ही पुत्र मी स्वराज्य उभारणीसाठी महाराजांकडे सुपुर्द करतो, असे अभिवचन दिले. पाळेकर म्हणाले आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना कामगारांना घटनेने दिलेल्या त्यांच्या मुलभूत अधिकारांसाठी झगडावे लागत आहे ही एक शोकांतिका आहे. समाजातील असंघटित कामगारांना संघटित करत शिवक्रांती कामगार संघटना मागील २५ वर्षापासून कामगार क्षेत्रात काम करत आहे. येथे घराणीशाहीला थारा नाही, कामगार हितासाठी काम करणार्‍या संघटकांचे जाळे येथे विणले आहे. त्यामधून कोणी एक जण या संघटनेचा वारसदार असेल. गोरगरीब व कष्टकरी समाजांचे राजकारण्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही, केवळ मतांसाठी त्यांचा वापर केला जातो. आज समाजातील कष्टकरी, शेतकरी, कामगार हे सर्वजण छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आशेने पहात आहे. याकरिता त्याच्या स्वराज्य निर्मितीत शिवक्रांतीचा प्रत्येक घटक त्यांना साथ देईल.

[read_also content=”सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी, त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा : दत्तात्रय भरणे https://www.navarashtra.com/maharashtra/big-opportunity-for-village-development-for-sarpanchs-take-full-advantage-of-it-dattatraya-bharne-nrdm-313174.html”]

या मेळाव्याचे सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले तर प्रस्ताविक अँड प्रथमेश पाळेकर यांनी सादर केले. रविंद्र साठे यांनी आभार मानले. मेळाव्याची सुरुवात कोल्हापूर दरबारातील शाहिर डाॅ. आझाद नाईकवडे यांच्या शाहिरीने झाली. यानंतर चौघाडा वादक रमेश पांचागे यांनी उत्कृष्ट चौघडा वादन सादर केले. सातार्‍याहून आलेल्या तुतारी वादकांचा देखील राजे यांनी सन्मान केला. शिवक्रांती कामागार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांनी आयोध्येतील श्रीराम मंदिराची व भगवान श्रीराम यांची प्रतिकृती भेट दिली.

Web Title: There should be a strict law in parliament to prevent incidents of womens abuse sambhaji raje chhatrapati nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 08:09 PM

Topics:  

  • Amit Shah
  • narendra modi
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Sambhaji Raje Chhatrapati

संबंधित बातम्या

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
1

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
2

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध
3

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक
4

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.