Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

येरवड्यातील तीन मंदिरातील दान पेट्या चोरट्यांनी फोडल्या

बंद फ्लॅट फोडण्यासोबतच आता मंदिरातील दान पेट्या फोडणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, विश्रांतवाडीनंतर येरवडा परिसरातील वेगवेगळे तीन मंदिरातील दान पेट्या फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 16, 2022 | 02:10 PM
येरवड्यातील तीन मंदिरातील दान पेट्या चोरट्यांनी फोडल्या
Follow Us
Follow Us:

पुणे : शहरात (Pune City) बंद फ्लॅट फोडण्यासोबतच आता मंदिरातील दान पेट्या फोडणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, विश्रांतवाडीनंतर (Vishrantwadi) येरवडा परिसरातील वेगवेगळे तीन मंदिरातील दान पेट्या फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या तीनही मंदिरातून चोरट्यांनी रोकड चोरून नेली आहे.

विश्रांतवाडीत नुकतेच दोन मंदिर फोडण्यात आले होते. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. यासोबतच कोथरूड भागात दोन फ्लॅट फोडले गेले आहेत.याप्रकरणी चंद्रकांत उर्फ बाबा मोहराव नायडु (वय ५७, रा. गणेशनगर, येरवडा) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

[read_also content=”जुन्या वादातून टोळक्याचा तुफान राडा; परिसरात फिरून माजवली दहशत https://www.navarashtra.com/maharashtra/a-gang-storm-from-an-old-dispute-there-was-panic-in-the-area-nrdm-326616.html”]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कामराजनगर येथील दत्त मंदिर, जयजवान नगर येथील दुर्गा माता मंदिर आणि मथुरा हॉस्पीटलच्या समोरील दुर्गा माता प्रतिष्ठानच्या मंदिरातील दान पेटीतील रोकड चोरली आहे. चोरट्यांनी प्रत्येकी ४०, १५ आणि ५५ हजारांची रोकड चोरून नेली आहे. या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चोरटे दुचाकीवरून आल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, अद्याप तरी त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यान, तीनच दिवसांपुर्वी विश्रांतवाडी येथील दोन मंदिरातील दान पेट्या फोडून प्रत्येकी २२ आणि ७ हजारांची रोकड चोरून नेली होती. या चोरट्यांचाही पोलिसांना अजून थांगपत्ता लागलेला नाही.

Web Title: Thieves broke donation boxes in three temples in yerwada nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2022 | 02:10 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • NAVARASHTRA
  • Pune Crime
  • Vishrantwadi

संबंधित बातम्या

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
1

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
2

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
3

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
4

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.