Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महिन्याभरापासून हजारो लीटर पाण्याची गळती, ठेकेदारावर कारवाई करा : श्रीरंग बारणे

निगडीतील सेक्टर 23 ते थेरगावातील पाण्याच्या टाकीपर्यंतच्या एक मीटर व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मागील महिन्याभरापासून या पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे करदात्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना दुसरीकडे निकृष्ट कामामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. ठेकेदार महापालिका अधिका-यांनाही दाद देत नाही. त्यामुळे तातडीने व्हीआयएल या ठेकेदारावर कारवाई करण्याची सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2022 | 04:29 PM
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महिन्याभरापासून हजारो लीटर पाण्याची गळती, ठेकेदारावर कारवाई करा : श्रीरंग बारणे
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : निगडीतील सेक्टर 23 ते थेरगावातील पाण्याच्या टाकीपर्यंतच्या एक मीटर व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मागील महिन्याभरापासून या पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे करदात्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना दुसरीकडे निकृष्ट कामामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. ठेकेदार महापालिका अधिका-यांनाही दाद देत नाही. त्यामुळे तातडीने व्हीआयएल या ठेकेदारावर कारवाई करण्याची सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने निगडीतील सेक्टर 23 ते थेरगावातील पाण्याच्या टाकीपर्यंत एक मीटर व्यासाच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. महापालिकेने चार वर्षांपूर्वी हे काम व्हीआयएल या ठेकेदाराला दिले. काम पूर्ण झाल्यामुळे महापालिकेने महिन्याभरापासून पाईपलाईनमधून पाणी सोडण्यास सुरुवात केली. पण, ठेकेदाराने पाईपलाईनचे काम दर्जात्मक केले नाही. डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटलपर्यंत पाईपलाईनमध्ये मोठे लिकेज आहेत. त्यामुळे पाणी गळती होत असून ठिक-ठिकाणी पाणी साचत आहे. मागील महिन्याभरापासून हजारो लीटर पाणी वाया जाते. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

याबाबत मी स्वत: आपणाकडे दोनवेळा तक्रार केली. परंतु, आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुनही व्हीआयएल या ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने हजारो लीटर पाण्याती गळती होत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांकडे सातत्याने तक्रार केली जात आहे. परंतु, संबंधित ठेकेदार महापालिका प्रशासनाला दाद देत नाही. पाईपलाईन तातडीने दुरुस्त करावी. तोपर्यंत पाईपलाईनमध्ये पाणी सोडू नये. व्हीआयएल या ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

[read_also content=”‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंदणी, अवघ्या तीन तासांत दोन हजार बैलगाडा ‘टोकन’; देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीची तयारी https://www.navarashtra.com/maharashtra/record-break-registration-two-thousand-bullock-cart-tokens-in-just-three-hours-preparations-for-the-largest-bullock-cart-race-in-the-country-nrdm-285135.html”]

हजारो लीटर पाणी वाया जात असताना प्रशासन गप्प का?

मागील सत्ताधा-यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अडीच वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या अनेक ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठ्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना मागील महिन्याभरापासून लिकेज पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तरी, देखील प्रशासन संबंधित ठेकेदारावर कारवाई का करत नाही. प्रशासन मुग गिळून गप्प का बसले आहे, अधिका-यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, असा सवालही खासदार बारणे यांनी केला.

Web Title: Thousands of liters of water leaked for a month due to poor quality work take action against the contractor shrirang barne nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2022 | 04:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • Rajesh Patil

संबंधित बातम्या

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?
1

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

भाजप अन् राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? हिम्मत असेल तर…; काँग्रेसचे आव्हान
2

भाजप अन् राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? हिम्मत असेल तर…; काँग्रेसचे आव्हान

Ajit Pawar Menifesto for Pune: मोफत मेट्रो आणि बस सेवेचे आश्वासन; पुणेकरांना अजित पवारांचा मास्टरप्लॅन प्लॅन
3

Ajit Pawar Menifesto for Pune: मोफत मेट्रो आणि बस सेवेचे आश्वासन; पुणेकरांना अजित पवारांचा मास्टरप्लॅन प्लॅन

70,000 crore scam:  ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले
4

70,000 crore scam: ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.