Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोहण्याचा मोहच बेतला जीवावर; साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, ‘ते’ स्वप्न राहिले अधुरेच…

तिघे मित्र चंद्रपूर गावातील साठवण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. वाढत्या उष्णतेमुळे त्यांनी तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2026 | 07:59 AM
अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; मित्रांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने खळबळ

अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; मित्रांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने खळबळ

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर : आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवून शिक्षणासाठी घरापासून दूर आलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा काळाने घात केला. राहाता तालुक्यातील लोणी येथील पायरेन्स संस्था संचलित व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा चंद्रपूर गावाजवळील साठवण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समजताच एकच खळबळ उडाली.

अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. शिक्षण घेऊन कुटुंबाचा आधार बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

२८ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू; मोसिन रशीद शेख असे मृत युवकाचे नाव

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे मित्र चंद्रपूर गावातील साठवण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. वाढत्या उष्णतेमुळे त्यांनी तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. आनंदाचे क्षण शोधण्यासाठी गेलेल्या या मित्रांच्या आयुष्याचा शेवट मात्र वेदनादायी झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तिघाही तरुणांना तलावातून बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तलाव परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही

ग्रामीण भागातील साठवण तलाव, बंधारे आणि जलसाठे परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सूचना फलक, सुरक्षा कठडे किंवा बचाव साधनांचा अभाव असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे नागरिक सांगतात. गेल्याच आठवड्यात संगमनेर तालुक्यात देखील एका खाणीत पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेथेही बचाव साधने नसल्याचे स्पष्ट झाले होते.

Web Title: Three students drown in sathavan reservoir incident in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:59 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Drowned in Water

संबंधित बातम्या

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ
1

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
3

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा
4

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.