Pen Ganesh Idols Reach Delhi: माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Maharashtra Ganesh Idols: गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू असताना यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर दिला जात आहे. अशातच पेणच्या सुप्रसिद्ध आणि पारंपरिक गणेशमूर्तींना यंदा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम माजी राज्यसभा खासदार तथा भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केले आहे. Pen Ganesh Idols Reach Delhi:
पेणची पारंपरिक गणपती मूर्तीकला ही केवळ पेणची ओळख नसून ती संपूर्ण महाराष्ट्राच्या समृद्ध कला व संस्कृतीचा अभिमान आहे. या स्थानिक कलेला थेट देशपातळीवर पोहोचवण्यासाठी धैर्यशीलदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पेणच्या नगरसेविका सौ. पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या संकल्पनेतून, दिल्ली येथील ‘महाराष्ट्र एम्पोरियम’मध्ये पेणचे सुप्रसिद्ध गणपती प्रथमच विक्रीसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, धैर्यशील पाटील यांनी स्वतः दिल्लीतील या प्रदर्शन केंद्राला भेट देऊन पेणच्या मूर्तिकारांची आणि कलाकारांची अतिशय आस्थेने विचारपूस केली व त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले. त्यांच्या या सक्रिय पाठिंब्यामुळे आणि दूरदृष्टीमुळे दिल्लीच्या माध्यमातून ही कला देशभरात पोहोचण्याची ऐतिहासिक संधी पेणकरांना मिळाली असून, ही निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
एका बाजूला धैर्यशील पाटील यांच्या पुढाकाराने दिल्लीत पेणच्या कलेचा असा राष्ट्रीय स्तरावर गौरव होत असताना, दुसरीकडे मुंबईतही पेणच्या मूर्तिकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. ऐनवेळी अस्सल शाडूची मूर्ती शोधणाऱ्या मुंबईकरांसाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून एक अत्यंत उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला आहे. महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्रशाली दिगावकर यांच्या प्रयत्नातून कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील ‘मराठी महाराष्ट्र एम्पोरियम’मध्ये (शॉप नं. A-30) पेणमधील मूर्तिकार आणि महिला बचत गटांनी बनवलेल्या सुबक शाडू मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!
शाडूच्या मातीची मूर्ती अतिशय सुबक असते आणि विसर्जनाच्या वेळी पाण्यात अवघ्या १५ ते २० मिनिटांत विरघळते, ज्यामुळे जलप्रदूषण टळते. यंदा माती, वाहतूक आणि रंगांच्या वाढलेल्या दरांमुळे मूर्तींच्या किमती थोड्या वाढल्या असल्या, तरी पीओपी आणि शाडूच्या मूर्तीच्या किमतीतील फरक फार मोठा नसल्याने भक्तांच्या खिशावर ताण पडत नाही.
गणेश मूर्ती खरेदी करायची असल्यास भाविकांनी ७७६७०५७०५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. धैर्यशील पाटील यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पेणच्या कलेला दिल्लीत मिळालेले राष्ट्रीय व्यासपीठ आणि मुंबईत इको-फ्रेंडली मूर्तींसाठी उपलब्ध झालेले विशेष दालन, यामुळे यंदाचा गणेशोत्सव पेणच्या मूर्तिकारांसाठी खऱ्या अर्थाने सन्मानाचा ठरला आहे.






