Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहकार क्षेत्राला बळकटी! साताऱ्यात प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले राहणार उपस्थित

सहकारी क्षेत्रामध्ये काम करुन इच्छुकांना आधुनिक व प्रभावी प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने सातारा जिल्ह्यात सहकार प्रशिक्षण सभागृह उभारण्यात आले आहे. याचे 20 एप्रिल रोजी लोकार्पण होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 02:44 PM
Training Hall Inaugurated to Provide Modern Training in the Cooperative Sector Satara News

Training Hall Inaugurated to Provide Modern Training in the Cooperative Sector Satara News

Follow Us
Follow Us:

Satara News : सातारा : सहकार चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांना आधुनिक व प्रभावी प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने सातारा जिल्ह्यात सहकार (Cooperation) प्रशिक्षण सभागृह उभारण्यात आले आहे. या प्रशिक्षण सभागृहाचे उद्घाटन सोमवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अजिंक्य कॉलनी, कॅम्प येथे होणार आहे.

या सभागृहाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नितीन पाटील असणार असून माजी खासदार संजय मंडलीक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

उद्घाटनानंतर सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सहकारी संस्था कार्यकर्त्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ‘सहकार चळवळीसमोरील आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर सहकार मंत्रालयातील सेवानिवृत्त सहसचिव एस. बी. पाटील आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समन्वयक रमेश बांडे मार्गदर्शन करणार आहेत.

हे देखील वाचा : नाशिकच्या TCS नंतर आता पुण्यातील Infosys मध्ये लव्ह जिहादचा डाव? IT क्षेत्रात उडाली खळबळ

हा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संघाचे संचालक धनंजय शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. जितेंद्र जगदाळे, संजीव साळुंखे यांच्यासह संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमास राष्ट्रीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानद सचिव रामदास मोरे, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, उपाध्यक्ष अनिल देसाई, विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, सहनिबंधक सोनाली रावल ठाकूर, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सहकार चळवळीच्या बळकटीसाठी आयोजित या कार्यक्रमास सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. जितेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष संजीव साळुंखे व संचालक मंडळाने केले आहे.

हे देखील वाचा : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही

विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा निशाणा

सुनील लांडगे वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर व कर्मचारी रात्रगस्त करीत असताना विनापरवाना खैर प्रजातीची लाकडे वाहतूक करताना महिंद्रा पिकअप MH 08 H 7790 व महिंद्रा स्कार्पियो MH 43 R 0906 वन विभागाने पकडली. आरोपी  संतोष पांडुरंग पार्टे, समीर संतोष पार्टे रा. केळघर ता. जावली जिल्हा सातारा यांना ताब्यात घेतले. सदर आरोपी यांनी गुन्हा कबूल केला असून वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) b अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हे प्रकरणात गाडी व माल किंमत असे अंदाजे 5,50,000/- माल जप्त केला.

Web Title: Training hall inaugurated to provide modern training in the cooperative sector satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • cooperation
  • Satara News
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.