Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शहरातील नागरिकांच्या कालावधीत अनेक विकासकामे हाती अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशासक घेण्यात आली, काही पूर्ण झाली तर काही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 13, 2026 | 04:07 PM
Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Follow Us
Close
Follow Us:
  • पाणी, कचरा, सांडपाणी प्रश्न प्रलंबित
  • नव्या नगराध्यक्षांसमोर मोठे आव्हान
  • श्रीवर्धनकरांचा नव्या पदाधिकाऱ्यांना इशारा
 

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शहरातील नागरिकांच्या कालावधीत अनेक विकासकामे हाती अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशासक घेण्यात आली, काही पूर्ण झाली तर काही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. मात्र या कामांपैकी काही कामे दर्जाहीन झाल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आता खऱ्या अर्थाने ‘ऍक्शन मोड’मध्ये येण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रशासकीय कारभाराच्या काळात रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामांवर खर्च झाला. परंतु काही ठिकाणी कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वीच काही रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित कामांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन

विविध विभागांमध्ये सभापतींची नेमणूक करण्यात आली आहे. या सभापतींनी आप-आपल्या खात्यांतील कामांचा आढावा घेऊन त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. नगराध्यक्षांसह सर्व सभापतींनी शहरातील मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करून समस्यांचे तातडीने निराकरण अपेक्षित आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान नगराध्यक्ष व नगरसेवकानी नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. शहरातील पाणीटंचाई, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सार्वजनिक सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या सर्व समस्यांचा अभ्यास करून ठोस कृती आराखडा जाहीर करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी

शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसहभाग महत्वाचा आहे. नगरपालिकेने नियमित आढावा बैठक घेऊन कामांचा दर्जा तपासावा, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी आणि नागरिकाना कामाची माहिती खुल्या पद्धतीने द्यावी, अशी अपेक्षा आहे. आता वेळ आश्वासनांची नाही, तर कृतीची आहे. असे श्रीवर्धनकराचे एकच म्हणणे आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी आणि विभागीय सभापतींनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या विकासासाठी ठोस व प्रभावी पावले उचलावीत. अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Transparent governance is needed for the development of shrivardhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • raigad

संबंधित बातम्या

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Raigad News: उकाड्यामुळे ग्राहक घरातच; महाड बाजारपेठेतील वर्दळ घटली, व्यापारी चिंतेत
2

Raigad News: उकाड्यामुळे ग्राहक घरातच; महाड बाजारपेठेतील वर्दळ घटली, व्यापारी चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.