Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tribal Hostel :शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबतचा शासन निर्णय रद्द ,वसतीगृह प्रवेशाची वयाची अट रद्द

Tribal Hostel : शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबत लागू करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वसतिगृह प्रवेशासाठी असलेली वयाची अटही रद्द झाली आहे. त्यामुळे वयाच्या मर्यादेमुळे प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 25, 2026 | 08:23 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

Tribal Hostel : विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींकडून प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून १४ ऑगस्ट २०२६ रोजीचा शासन निर्णय तसेच त्यानुषंगाने जारी करण्यात आलेली एकत्रित सुधारित नियमावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वूईके यांनी दिली.

शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रवेश प्रक्रिया तसेच वसतिगृह व्यवस्थापनाच्या विविध बाबींवर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीस मंत्री नरहरी झिरवळ, आदिवासी खासदार,आमदार,आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे,आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) आयुक्त निलेश सागर यावेळी उपस्थित होते.

IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!

शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आवश्यक सोयी-सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वसतिगृह व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी प्रवेश प्रक्रिया, सोयी-सुविधा, प्रशासकीय कार्यपद्धती, देखरेख व तपासणी याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री श्री.वूईके यांनी बैठकीत दिले.

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

वसतिगृह व्यवस्थेतील अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना सुविधा अधिक परिणामकारकपणे उपलब्ध करून देण्यात याव्यात. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून विद्यार्थीकेंद्रित, पारदर्शक आणि अधिक सक्षम वसतिगृह व्यवस्था निर्माण करण्यासाठी काम करण्याबाबतही मंत्री वूईके यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Tribal hostel government decision regarding government tribal hostels revoked age limit for hostel admission scrapped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • goverment news
  • Maharashtra News Update

संबंधित बातम्या

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा
1

Farmers Help : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; नाशिक, अहिल्यानगर, जळगावला दिलासा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
2

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा
3

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले
4

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.