Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंडे यांचा आदेश.. अन गडबडीत नावे गायब ; सोलापूर झेडपीच्या आरोग्य विभागातील प्रकार

आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा धसका वाढतच चालला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुंढे यांनी आरोग्य सेवकांना प्रतिनियुक्ती देता येणार नाही, असे आदेश जारी करताच आरोग्य विभागाची पाचावर धारण बसली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत उडालेल्या गडबडीत काही कर्मचार्‍यांची नावे गायब झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 16, 2022 | 12:56 PM
तुकाराम मुंडे यांचा आदेश.. अन गडबडीत नावे गायब ; सोलापूर झेडपीच्या आरोग्य विभागातील प्रकार
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा धसका वाढतच चालला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुंढे यांनी आरोग्य सेवकांना प्रतिनियुक्ती देता येणार नाही, असे आदेश जारी करताच आरोग्य विभागाची पाचावर धारण बसली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत उडालेल्या गडबडीत काही कर्मचार्‍यांची नावे गायब झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील आरोग्य अधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी एकाही आरोग्य सेवकाला परस्पर प्रतिनियुक्ती किंवा नियुक्तीचे ठिकाण सोडून इतर काम देउ नये असे आदेश दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी या आदेशान्वये प्रतिनियुक्तीवर असलेल्या 13 कर्मचार्‍यांची यादी जाहीर केली. या कर्मचार्‍यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. पण आरोग्य विभागातील प्रतिनियुक्तीला असलेले आणखी काही कर्मचारी यादीतून गायब असल्याचे दिसून आले आहे. गायब नावाची यादी आयुक्त मुंढे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

सीईओच्या मर्जीतील कर्मचारी
प्रतिनियुक्तीच्या यादीतून गायब असलेले आरोग्य सेवक सीईओ दिलीप स्वामी यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांची नावे वगळण्यात आल्याची झेडपीत चर्चा आहे. विशेष म्हणजे आरोग्य सेवक आयटीसेल चालवितात हा कौतुकाचा विषय आहे. आयुक्त मुंढे यांच्याकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते याकडे कर्मचारी संघटनांचे लक्ष लागले आहे.

आमदारांनी केली होती तक्रार
जिल्हा परिषदेच्या आयटीसेलमध्ये तिसरा डोळा म्हणून कामकाज करणार्‍या आरोग्य सेवकांची सीईओ दिलीप स्वामी यांनी मर्जी राखल्याची चर्चा होत आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी या कर्मचार्‍यांबाबत तक्रार केली होती. आरोग्य सेवकांना मूळ ठिकाणी पाठवून संगणक पदवीधर कर्मचारी नियुक्त करावेत अशी सूचना केली होती. पण आमदाराच्या सूचनेला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आता आयुक्त मुंढे यांचे अस्त्रही निष्प्रभ करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा कर्मचार्‍यांत रंगली आहे.

Web Title: Tukaram mundes order names disappear in confusion nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 12:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Baramati News: शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! बनावट नियुक्तीपत्र देत 1.36 कोटींची फसवणूक
1

Baramati News: शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! बनावट नियुक्तीपत्र देत 1.36 कोटींची फसवणूक

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश
2

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण
3

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी
4

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.