Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकरला नटरंग ॲकॅडमीतर्फे दिला जाणारा ३२वा स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2026 | 11:59 AM
अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; 'या' तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; 'या' तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

Follow Us
Follow Us:
  • अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर
  • बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण
  • चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते पुरस्कार
पुणे : लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर ला नटरंग ॲकॅडमीतर्फे दिला जाणारा ३२वा स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच चौथा स्वर्गीय गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्कार गणेशभक्त व सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा स्वरदा बापट आणि कार्याध्यक्ष जतिन पांडे यांनी दिली.

 

स्व. शाहीर मधू कडू यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, मानाचा फेटा आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत स्वर्गीय गिरीश बापट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येतो.

हे सुद्धा वाचा : रणवीर सिंहने सोडला ‘Don 3’ चित्रपट, संकटात सापडला अभिनेता; FWICE ने घातली बंदी, काय आहे प्रकरण

अमृता खानविलकरने नटरंग, कट्यार काळजात घुसली, राझी, मलंग आणि चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांत अभिनय आणि नृत्याद्वारे विशेष ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील अमृता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तर शिरीष मोहिते यांनी जय गणेश व्यासपीठ आणि सेवा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सोहळ्यानिमित्त नटरंग कला ॲकॅडमीच्या १२५ कलाकारांचा ‘नृत्यरंग’ हा विशेष कार्यक्रमही सादर करण्यात येणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.

हे सुद्धा वाचा : दुहेरी आनंद! दिव्यांका – विवेकने दिली चाहत्यांना खुषखबर, ‘करण अर्जुन आ गए’; जुळ्या मुलांना दिला जन्म

Web Title: Amrita khanvilkar has been announced as the recipient of the natrang kalagaurav award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार
1

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य
2

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क
3

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध
4

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.