फोटो सौजन्य सोशल मिडिया
बॅालिवुड मधिल प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषधप्रशासनाने नोटीस बाजवल्या नंतर तुकाराम मुंढे यांनी मोठे भाष्य केले. तुकाराम मुंडे म्हटले की, तुमच्यासाठी ते सुपरस्टार आहेत, माझ्यासाठी ते फक्त जाहिरातदार आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. ते कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
महाराष्ट्र अन्न व औषधप्रशासनाने बजावलेल्या नोटीसला तिन्ही अभिनेत्यांनी प्रतिसाद दिला नसून, तिन्ही अभिनेत्यांनी यावर खुलासा केलेला नाही. महाराष्ट्र अन्न व औषधप्रशासनाने बजावलेल्या विमल व इलायचीच्या नावाखाली बंदी असून विमल आणि पान मसाला छुप्या पद्धतीने विकला जात आहे. त्यांची जाहिरात केली जात आहे , या तिन्ही अभिनेत्यांना 15 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पान मावा गुटखा तंबाखू इत्यादी पूर्णपणे बंदी असून ही बंदी 2012 साली लागू करणअयात आली होती . अन्न व औषधप्रशासनाने असा युत्तीवाद केला आहे की , तरी तिचे ब्रँडिंग पान मसाला ब्रँडशी अप्रत्यक्ष संबंध जोडू शकते. या प्रकरणी अलिकडेच ११ ऑगस्ट रोजी एफडीएने या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावली होती. आता यापुढे एफडीए आता काय पावले उचलतं, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.
FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक …
“अन्न सुरक्षा कायदा जाहिरातदाराची आणि त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी स्पष्टपणे अधोरेखित करतो. ते पुढे म्हणाले, “ज्या गोष्टीची जाहिरात करत आहोत, त्याबाबत योग्य ती खबरदारी घेणे ही संबंधित व्यक्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांची कोणतीही जबाबदारी नाही असं म्हणणं चुकीचं आहे… केवळ नैतिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर कायदेशीर दृष्टिकोनातूनही बोलत आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.






